Home महाराष्ट्र जालना मर्चंट बँक घोटाळयामधील आरोपी प्रविण पांडुरंग पुरी अटकेत आर्थिक गुन्हे शाखेची...

जालना मर्चंट बँक घोटाळयामधील आरोपी प्रविण पांडुरंग पुरी अटकेत आर्थिक गुन्हे शाखेची कामगीरी पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजुर

जालना मर्चंट बँक घोटाळयामधील आरोपी प्रविण पांडुरंग पुरी अटकेत आर्थिक गुन्हे शाखेची कामगीरी पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजुर

 

 

जालना शहरातील जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअर हाऊस च्या नावे 177 बनावट खातेदारांच्या माध्यमातुन 23 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक केल्या बाबत तक्रार प्राप्त झाल्यावरुन चंदनझीरा पोलीस स्टेशन येथे नमूद प्रकरणात चंदनझीरा गु.र.नं. 220/2026 कलम 316(5), 316(2), 318(4), 336(3), 338, 340(2), 61(2), 3(5) BNS 2023 सह कलम 3,4 व 5 MPID प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर बँकेमध्ये अपहार झाल्याने व सदर अपहाराची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने गुन्ह्याची व्याप्ती बघून मा. पोलीस अधीक्षक जालना यांनी सखोल तपास करण्या बाबतचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिलेले आहेत.

गुन्हयात यापुर्वी अटक आरोपी

1) रायचंद सखाराम कुरंगळ – मुख्य सुत्रधार, 2) निलेश्वर शेषराव भोसले – सहकारी

3) रामेश्वर विलासराव जाधव- सहकारी, 4) ज्ञानेश्वर विलासराव जाधव- सहकारी

5) सुधाकर रावसाहेब ठोंबरे – सहकारी, 6) गणेश रमेश साबळे – कुरंगळ यांचे मॅनेजर

7) राजेंद्र भिकचंद टोकशा – जालना मर्चंट बँक महाव्यवस्थापक

8) नटवर सत्यनारायणजी दायमा- शाखा अधिकारी जालना मर्चंट बँक शाखा भोकरदन

नविन आरोपी अटक.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये साक्षीदार व आरोपींकडे केलेल्या तपासात व मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे व निष्पन्न तथ्या आधारे आरोपी नामे प्रविण पांडुरंग पुरी वय 32 वर्षे व्यवसाय शेती व व्यापार रा. पेरजापुर ता. भोकरदन जि.जालना याचा गुन्हयात सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास आज दिनांक 09/05/2026 रोजी भोकरदन रोड बायपास जालना येथुन ताब्यात घेऊन अटक करण्यात आली तर त्यांचे चौकशीमध्ये इतरही नावे समोर येण्याची शक्यता आहे. आरोपीतांकडे चौकशी चालु असुन इतर निष्पन्न आरोपीतांचा शोध सुरू आहे.

कामगीरी पार पाडणारे अधिकारी अंमलदार.

मा. श्री. तेगबीर सिंह संधू पोलीस अधीक्षक जालना श्री.सुरेश उनवणे

प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना, श्री. मिथुन घुगे स.पोलीस निरीक्षक

आ.गु.शा. शैलेश म्हस्के, पो.उप.नि. आ.गु.श

आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, श्रेयस वाघमारे, यांनी पार पाडली.

आर्थिक गुन्ह्यांवर कठोर कारवाई- जालना पोलीस सदैव तत्पर

Don`t copy text!