Home महाराष्ट्र सोयगाव : आमखेडा परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा ; ग्रामस्थांचे आमरण...

सोयगाव : आमखेडा परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा ; ग्रामस्थांचे आमरण उपोषण

सोयगाव : आमखेडा परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा ; ग्रामस्थांचे आमरण उपोषण

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले

सोयगाव शहरालगत असलेल्या आमखेडा परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी तहसील कार्यालय सोयगाव समोर शुक्रवार (दी.३) पासून ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहेत.

 

आमखेडा परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालय सोयगाव समोर शुक्रवार (दी.३) पासून ग्राम पंचायत सदस्य अनिल नारायण ठाकरे व बाळु हेमराज बेदवे आमरण उपोषणास बसले आहेत.

त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सोयागाव,तहसीलदार सोयगाव व जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण छ्त्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या निवेदनात हे सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायत आमखेडा मासिक मीटिंग ठराव क्र. ८/६ दि.३१/१०/२०२५

तसेच ग्रामपंचायत आमखेडा यांचा पोलीस ठाणे सोयगाव यांना दिलेला अर्ज, दि.१६/३/२०२६ चा उल्लेख केला आहे.तसेच आमखेडा गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु असून, त्यामध्ये पत्त्यांचे क्लब (जुगार अड्डे) अत्यंत मोठ्या प्रमाणात चालवले जात आहे.

या अवैध धं‌द्यांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून, आर्थिक व सामाजिक परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करत आहे. विशेष म्हणजे, वि‌द्यार्थी वर्ग देखील या गैरप्रवृत्तीच्या विळख्यात अडकत असून त्यांच्या भविष्यावर मोठा परिणाम होत आहे. गावातील शांतता, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचे म्हंटले आहे.

फोटो ओळ:- सोयगाव -आमखेडा परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले ग्रामस्थ

Don`t copy text!