Home पाचोरा पाचोऱ्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण मेळावा उद्या

पाचोऱ्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण मेळावा उद्या

पाचोऱ्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण मेळावा उद्या

 

 

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात संघटनात्मक बांधणी, निवडणूक नियोजन तसेच कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांची अमरावती लोकसभा संपर्कप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे :

दिनांक : 6 एप्रिल 2026

वेळ : सकाळी 10:30 वा.

स्थळ : समर्थ लॉन्स, सारोळा रोड, पाचोरा

Don`t copy text!