भिंगारच्या नायब तहसीलदाराची विनाशकाले विपरीत बुद्धी, रेल्वेखाली उडी मारून जिवनाचा शेवट केला?
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
भिंगार येथे रहीवाशी असलेल्या आणि अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात नायब तहसीलदार म्हणून सेवेत असलेल्या नायब तहसीलदाराला “विनाशकाले विपरीत बुद्धी” होउन त्यांनी रेल्वे खाली उडी मारून जिवनाचा शेवट केला.
या बाबतची घटना अशी की दिनांक ३१ जानेवरी २०२६ रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात सेवेत असलेले आणि भिंगार येथे रहीवाशी असलेले नायब तहसीलदार किरण रामदास देवतेसे (वय ५७ वर्षे) यांनी अमरावती ते पुणे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या भारतीय रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या करीत जिवनाचा शेवट केला.ही घटना अहिल्या नगर एम. आय.डी. सी. ते निंबळक कडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे फाटका जवळ घडली.सदरची आत्महत्या केल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी अहिल्यानगर येथील एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनला फोन करून ही माहिती दिली. मग येथिल पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन मयताची पाहणी केली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरून माहिती घेतली असता त्यांना सदर आत्महत्या ग्रस्त व्यक्तीची अशी माहिती मिळाली की ते रेल्वे खालील प्रेत हे भिंगार येथे रहीवाशी असलेल्या आणि अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात सेवेत असलेल्या नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे यांचे असल्याचे लक्षात आले. मग पोलीसांनी सदर प्रेताचा पंचनामा करून तो मृतदेह नगर येथील सरकारी रुग्णालयात पुढील उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.नायब तहसीलदार यांनी आत्महत्या का केली याचा उलगडा पोलिस करीत आहेत.या प्रकरणी एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या आत्महत्ये मुळे महसूल विभागातील कर्मचारी वर्गात कमालीची घबराट पसरली आहे.नायब तहसीलदार देवतरसे यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली याची पोलिसांनी कसुन चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात असा नेमका काय प्रकार घडला की थेट नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे यांना आत्महत्या करावी लागली.

























