‘खान्देशी माणूस कोमल हृदयाचा असून त्याची अहिराणी मायबोली चालतं बोलतं विद्यापीठ आहे’-*सुप्रसिद्ध विनोदी कलाकार प्रवीण माळी
(सांस्कृतिक व विनोदी कार्यक्रमाला रसिकांचा लाभला भरघोस प्रतिसाद)
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात आज दि.09 जानेवारी 2026 रोजी आयोजित ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ उदघाटन चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते माजी शिक्षणमंत्री कै.मा.ना.अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक म्हणून चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात तसेच प्रमुख वक्ते व सुप्रसिद्ध विनोदी अहिराणी एकपात्री नाटककार प्रवीण माळी, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य-गोविंदा महाजन, बाजीराव पाटील, नियामक मंडळ सदस्य हनुमंतराव सूर्यवंशी, छगन पाटील, प्रा. एस. आर. वाघ, नरेंद्र शिंदे नंदलाल शिंदे त्याचप्रमाणे चोपडा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.भारती महेंद्र बोरसे, चोपडा साखर कारखान्याच्या माजी चेअरमन सौ. निताताई पाटील, चोपडा नगरपरिषेच्या नगरसेविका सौ.वंदना बाविस्कर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम. बागुल, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ, उपप्राचार्य पी. एस. पाडवी, पर्यवेक्षक तसेच कनिष्ठ विभाग स्नेहसंमेलन प्रमुख ए. एन.बोरसे, रजिस्ट्रार डी. एम. पाटील, वरिष्ठ विभाग स्नेहसंमेलन प्रमुख विशाल पी. हौसे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी केले.
याप्रसंगी शिरपूर येथील सुप्रसिद्ध अहिराणी विनोदी लोककलाकार व एकपात्री नाटककार प्रवीण माळी यांनी ‘आयतं पोयतं सख्यानं’ या भन्नाट विनोदी अहिराणी एकपात्री नाटिकेचे सादरीकरण करून खान्देशी परिसरातील लग्न प्रसंगांचे 45 पात्रांचा समावेश असलेले ‘आयतं पोयतं सख्यानं’ या अहिराणी बोलीतील विनोदी नाट्याचे बहारदार सादरीकरण केले तसेच खान्देशच्या विविध भागातील अहिराणी बोलीचे नमुने विनोदातून सादर केले. यावेळी ते म्हणाले की, ‘खान्देशी माणूस कोमल हृदयाचा आहे. खान्देशची अहिराणी मायबोली जागतं विद्यापीठ आहे.आपल्या माय बापाची किंमत अनमोल आहे. आपला आई वडिलांची काळजी आजच्या तरुणांनी घेतली पाहिजे.तसेच व्यसनाधीनतेबाबत सतर्क राहिले पाहिजे. अहिराणीचा प्रचार व प्रसार करा तिचे संवर्धन करा’, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. या विनोदी अहिराणी कार्यक्रमाला प्रेक्षक, विद्यार्थी रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना तहसीलदार भाऊसाहेब थोरात म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊन कलेत पारंगत व्हावे. जिद्द, धडपड, सातत्य ठेवून आई वडिलांची स्वप्न साकार करावीत’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. एम. एल. भुसारे व व्ही. डी. शिंदे यांनी केले तर आभार वरिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख विशाल पी. हौसे यांनी मानले.
याप्रसंगी मेहंदी, रांगोळी, व्यंगचित्र, चित्रकला, पाककला स्पर्धा तसेच आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. या सर्व स्पर्धांचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन 2026 निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात एकपात्री नाटिका, पथनाट्य, एकल नृत्य, समूह नृत्य, भावगीत गायन, आदिवासी नृत्य, कॉमेडी शो, विनोदी नाटिका, सुगम गायन, समूह गायन, गीत गायन, मिमिक्री असे एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांनी उत्साहात सादरीकरण केले. रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख प्रा.डॉ.बी.एम. सपकाळ, डॉ.एल. बी. पटले, एस.बी.देवरे, सौ.एस.एस.पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
















