Home महाराष्ट्र धनगर समाज एसटी आरक्षण लढ्यासाठी मुंबई येथे बैठकीचे आयोजन ‌

धनगर समाज एसटी आरक्षण लढ्यासाठी मुंबई येथे बैठकीचे आयोजन ‌

धनगर समाज एसटी आरक्षण लढ्यासाठी मुंबई येथे बैठकीचे आयोजन

 

 

(‌सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

धनगर समाज एसटी आरक्षण लढा संपूर्ण राज्यभर उभारण्यात आला असुन समाजाचे नेते दिपक बोर्हाडे यांनी गेल्या तिन महिन्या पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे.जेथे जाणार तेथिल धनगर समाजाला दिनांक २१ जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या ‌आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.या धनगर समाज एसटी आरक्षण आंदोलन लढ्यात उपोषनार्थी, धनगर समाजाचे गाढे अभ्यासक,थोर विचारवंत,प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ, समाजसेवक आणि या आंदोलनात सहभागी होऊन या आरक्षण लढ्यासाठी जे आपले सर्व प्रकारचे योगदान देऊ इच्छितात अशा सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येत आहे की दिनांक २१ जानेवारी रोजी नवी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन मंडळाची आंदोलन पुर्व बैठक दिनांक १० जानेवारी रोजी सानपाडा मुंबई येथे होणार आहे.तरी राज्यातील सर्व नेते सक्रिय कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या आंदोलन पुर्व बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन दिपक बोर्हाडे यांनी केले आहे.

Don`t copy text!