वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडून मुस्लीम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा
*पाचोरा, दिनांक १८ (प्रतिनिधी )* : आज ईद-ए-मिलाद निमित्त शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
शिवसेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाजवळ आज ईदच्या निमित्ताने स्टॉल उभारण्यात आला होते. येथे मुस्लीम बांधवांना दूध वाटप करून किटची भेटवस्तू देत त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. शहरातील हजारो समाज बांधवांना या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी नरेंद्रसिंगदादा सूर्यवंशी, भरत खंडेलाल, गजू पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, मनोज चौधरी, बंटी हटकर, संदीप जैन, गफ्फारभाई, आवेश खाटीक, रसूलदादा, नदीमभाई आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.