Home पाचोरा पाचोरा येथे कोळी समाजाच्या विविध संघटनेची , जळगावात होत असलेल्या आमरण उपोषणाच्या...

पाचोरा येथे कोळी समाजाच्या विविध संघटनेची , जळगावात होत असलेल्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने विचार विनिमय सभा संपन्न करण्यात आली

पाचोरा येथे कोळी समाजाच्या विविध संघटनेची , जळगावात होत असलेल्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने विचार विनिमय सभा संपन्न करण्यात आली

पाचोरा शहरातील स्वामी लाॅंन्स येथे आज दि.०८/१०/२०२३ रविवार रोजी येथे मा. प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली , प्रल्हाद सोनवणे(जिल्हा अध्यक्ष) जितेंद्र सपकाळे , संभाजी शेवरे(जिल्हा उपाध्यक्ष),संजय सोनवणे चाळीसगाव,दशरथ जाधव(तालुकाध्यक्ष), राजेंद्र मोरे सर पाचोरा, मच्छिंद्र आबा चव्हाण चाळीसगाव, कोळी समाजाचे जेष्ठ अभ्यासु सल्लागार ॲड.शांतीलाल सैंदाणेजी,तरुण तडफदार नेतृत्व श्री खेमचंद कोळी, नामदेव कोळी,अनिलजी सावळे (ग्रामीण जिल्हाउपाध्यक्ष) अशोक महाले, श्री अशोक सपकाळे , श्री.रविन्द्र शेठ नन्नावरे, श्री सचिनभाऊ सोनवणे, दिपकभाऊ शेवरे, श्री अनिलभाऊ मासरे, श्री.अनिकेत दादा सुर्यवंशी, श्रीयुत रविन्द्र सुर्यवंशी, प्रविणभाऊ मोरे, पप्पू कोळी, ठाकरे सर,महारु कोळी, संजय कोळी,बि.टी.बाविस्कर, संजय मासरे,पै.भिकनभाऊ कोळी , श्री राजेंद्र खैरनार, श्री रविंद्र भाऊ कोळी साजगाव,समाधानभाऊ सोनवणे बात्सर चे सोनवणे दादा, यावेळी एरंडोल चे एकदिवसीय उपोषणाला यश मिळवुन देण्याबाबत पै भिकनभाऊ कोळी यांचे बाविस्कर दादा यांनी शब्द सुमनांनी कौतुक केले अशे उपोषण यशस्वी झाले पाहिजे असे सांगुन बांधवांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती देण्यासाठी आव्हान करण्यात आले यावेळी तिन्ही तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जळगाव येथे होऊ घातलेल्या अन्नत्याग उपोषणासाठी संपुर्ण पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील कोळी समाज मोठ्या संख्येने सहभाग घेणार असल्याचे घोषित करण्यात आले, तसेच या उपोषणासाठी पाचोरा तालुक्यातील महीला,तरुण, विवीध संस्था/संघटना पदाधिकारी, विदयार्थी, यांचा सहभागासाठी आवाहन करण्यात आले 1 .सुलभरित्या सरसकट जात प्रमाणपत्र मिळावे 2. जळगाव येथे जात पडताळणी समिती कायमस्वरूपी जळगाव येथे यावी 3.इतर समाजाप्रमाणे आदिवासी कोळी समाज विकासासाठी महर्षि वाल्मीकी ऋषी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालूच राहिल असे प्रभाकर आप्पा यांनी सांगितले सूत्रसंचालन सुभाष सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन संभाजी शेवरे यांनी मानले. तसेच सर्व समाज बांधवांना दुपारचे प्रितीभोजन हे पाचोरा येथील स्वप्नशील रेसिडेन्सी मध्ये श्री अनिकेत भाऊ सुर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आले.

Don`t copy text!