Home पाचोरा राष्ट्रीय स्तरावरील ‘शिक्षा शिरोमणी’ पुरस्काराने प्रा. सौ. जयश्री वाघ सन्मानित; संस्थेच्या शिरपेचात...

राष्ट्रीय स्तरावरील ‘शिक्षा शिरोमणी’ पुरस्काराने प्रा. सौ. जयश्री वाघ सन्मानित; संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

राष्ट्रीय स्तरावरील ‘शिक्षा शिरोमणी’ पुरस्काराने प्रा. सौ. जयश्री वाघ सन्मानित; संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

 

अमरावती येथे आयोजित चौवीसाव्या अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन २०२६ मध्ये प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘शिक्षा शिरोमणी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होत असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

या यशाबद्दल संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री दिलीपभाऊ वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले सर , श्री. नितीन पाटील सर , श्री. गौरवदादा वाघ, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. पुरी सर तसेच श्री एस. एल. पाटील सर उपस्थित होते.

 

उपस्थित मान्यवरांनी तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी प्रा. सौ जयश्रीताई वाघ यांचे अभिनंदन करत त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी भरभरून कौतुक केले. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला असून शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी त्या प्रेरणादायी ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांना पुढील शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Don`t copy text!