Home महाराष्ट्र मढीच्या कानिफनाथ यात्रेत अन्न भेसळ आणि औषध प्रशासनाने तपासणी केल्या नंतरच पेढ्याच्या...

मढीच्या कानिफनाथ यात्रेत अन्न भेसळ आणि औषध प्रशासनाने तपासणी केल्या नंतरच पेढ्याच्या प्रसाद विक्रीस परवानगी : प्रांताधिकारी मते?

मढीच्या कानिफनाथ यात्रेत अन्न भेसळ आणि औषध प्रशासनाने तपासणी केल्या नंतरच पेढ्याच्या प्रसाद विक्रीस परवानगी : प्रांताधिकारी मते?

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथिल कान्होबा उर्फ कानिफनाथ देवाच्या यात्रेत प्रसाद म्हणून पेढ्याची विक्री केली जाते. परंतु या पेढ्याची अन्न भेसळ आणि औषध प्रशासनाने तपासणी केल्या नंतरच पेढे विक्री साठी परवानगी दिली जाईल असे आदेश पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब यांनी दिले आहेत.ते कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कान्होबा गडावर आयोजित केलेल्या आगामी यात्रा नियोजन मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष पदावरून बोलत होते.यावेळी महसूल विभाग, पोलिस खाते, राज्य उत्पादन शुल्क,आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद,अन्न भेसळ आणि औषध प्रशासन, धर्मदाय आयुक्त कार्यालय,राज्य परिवहन महामंडळ,भारत संचार निगम, सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग,पशुहत्या बंदी, या सर्व सरकारी खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.प्रारंभी कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठलराव मरकड यांनी प्रास्ताविक केले. या यात्रेत विक्री साठी ठेवलेल्या प्रत्येक प्रसादाची कसुन तपासणी केली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात भेसळ युक्त दुध आणि त्या पासून बनवलेल्या खव्याची राजरोसपणे विक्री होत आहे.हे अनेक यात्रेतील प्रसादाची कसुन तपासणी केली असता निदर्शनास आले आहे.तेव्हा कुठे प्रशासनाने खडबडून जागे होऊन हा निर्णय घेतला आहे.भेसळ युक्त खवा,बासुंदी, बर्फी,रेवडी,या प्रसादाची कसुन तपासणी करण्यात येणार आहे.या तपासणीत कोणत्याही प्रकारची भेसळ आढळली तर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची ही चांगलीच झाडाझडती घेतली गेली.तिसगाव , निवडुंगे, धामणगाव, मायंबा,शिरापूर,घाटशिरस,या डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. साईड पट्यावर मोठ मोठ्या कपारी पडलेल्या आहेत.त्या दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कावडी मिरवणूकीत डीजे न वाजवणे हे बंधन कारक केले आहे.या वर्षी डी जे मुक्त कावडी,छबिना,पालखी मिरवणूक होणार आहे.डीजे वाजवणारा वर गुन्हे दाखल करून डीजे जप्त करण्यात येणार आहे असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.या यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक दुकान दारास ग्राम पंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे. या यात्रेत दारु विक्री आणि चोऱ्या होउ नये म्हणून पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदिप ढाकणे यांनी१५० पोलीस आणि काही होमगार्ड संघटनेच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे असे सांगितले.तसेच नेहमी प्रमाणे दत्त मंदिरा समोर पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे.देवस्थानच्या मोकळ्या जमिनीत पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.या यात्रेसाठी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे.निवडुंगे मधुन आत प्रवेश तर तिसगाव रस्त्याने बाहेर जाता येणार आहे.मायंबा गडावरून येणाऱ्या भाविकांनी पुन्हा घाटशिरस मार्गे माघारी जावे त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल.हा यात्रा महोत्सव १८ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.१८ फेब्रुवारी रोजी भट्टीचा सन साजरा करण्यात येणार आहे.आणि त्याच दिवशी रात्री ९ वाजता गडावर राज्यातील मानाची पहीली होळी पेटवली जाणार आहे.२२ तारखेला तेल लावले जाणार आहे.२ मार्च रोजी कैकाडी समाजाची मानाची काठी मुख्य कळसाला टेकवून पोलिस बंदोबस्तात गोपाळ समाजाची मानाची होळी पेटवली जाणार आहे.८मार्च रोजी रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे.त्या दिवशी मढी येथे गाढवांचा बाजार भरवला जाणार आहे.१५ मार्च रोजी मढी येथुन पैठण कडे कावडीचे प्रस्थान होणार आहे.१८ मार्च रोजी फुलबाग यात्रा आणि मानाच्या कावडीच्या काठ्याची निशाण भेट होईल.आणि नाथांच्या समाधीवर जलाभिषेक करण्यात येणार आहे.१९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी कानिफनाथ समाधीस लेप लाउन महापुजा होउन या यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.यात्रा काळात सर्व सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे.त्यासाठी सर्व शासकीय खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या नियोजन मंडळाच्या बैठकीस तहसीलदार उद्धव नाईक साहेब, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव मरकड,उपाध्यक्ष सुरसींगराव पवार, सरचिटणीस माधुरी गणेश मरकड,चिटणीस अनिल साठे, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड,विश्वस्त उत्तमराव मरकड, तानाजी शिंदे,मदन मरकड,सौ उषा मरकड,मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड, माजी विश्वस्त रविंद्र आरोळे, डॉ.रमाकांत मडकर, डॉ.भगवान दराडे, उत्पादन शुल्क विभागाचे सी.एस.रासकर, वायरमन भारत गोसावी, अभियंता आर‌.टी.कांबळे,आर.के.राजळे, पंकज देवरे, ग्रामसेवक जी.बी.ढाकणे, मंडल अधिकारी पी.ए.कटारनवरे, तलाठी सौ.धाडगे मॅडम,निवडुंगे गावातील सरपंच वैभव देशमुख इत्यादी मान्यवरा सह मढी निवडुंगे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब, तहसीलदार उद्धव नाईक साहेब, उत्पादन शुल्क अधिकारी रासकर साहेब आणि उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.देवस्थान च्या वतीने उपस्थित अधिकारी, पदाधिकारी यांना महाप्रसाद देण्यात आला.

Don`t copy text!