श्री.गो.से.हायस्कूलला प्रजासत्ताक दिन उत्साहात “अठराशे विद्यार्थ्यांनी केली सांघिक कवायत”

श्री.गो.से.हायस्कूलला प्रजासत्ताक दिन उत्साहात “अठराशे विद्यार्थ्यांनी केली सांघिक कवायत”

 

 

पाचोरा-पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख,तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याचे देशभक्तीपर गीतावर अठराशे विद्यार्थ्यांनी केलेली सांघिक कवायत,तसेच डंबेल्स,घुंगरू काठी, करले यांची कवायत,स्काऊट गाईडच्या पथकाने केलेले पथ संचलन हे आगळे वेगळे वैशिष्ट्य ठरले.

यावेळी संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीपर गीत सादर केले तर श्रद्धा सोनवणे या विद्यार्थिनीने देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकून घेतले.यावेळी भाग्यश्री खरे या विद्यार्थिनीने प्रजासत्ताक दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक सतीश चौधरी,शशिकांत चंदिले,डॉ.अमोल जाधव,डॉ.नरेश गवांदे, माजी मुख्याध्यापक सुधीर पाटील, माजी पर्यवेक्षक पी जे पाटील, शांताराम चौधरी,ए.जे. महाजन, माजी तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.

पाटील शाळेचे मुख्याध्यापक एन.आर.पाटील

(ठाकरे) पर्यवेक्षक सौ.ए.आर.गोहिल, पर्यवेक्षक आर.बी.बांठिया,किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौडिण्य, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर उपस्थित होते.

सागर थोरात आणि रुपेश पाटील यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केले तर संगीत कवायतीसाठी संजय करंदे,महेश चिंचोले, संदीप मनोरे यांनी संचलन केले तर पथक संचालनासाठी स्काऊट गाईड विभागाचे आर.बी.कोळी,अमित नागरगोजे, शुभम पाटील यांनी संचलन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी.बोरसे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.