आदर्श ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांची वाढदिवसाच्या निमित्ताने कासार पिंपळगाव प्राथमिक शाळेस पाच हजार रुपये देणगी

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायत कासार पिंपळगाव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांचा कासार पिंपळगाव प्राथमिक शाळेत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार पिंपळगाव येथे ग्रामविकास अधिकारी प्रमोद म्हस्के यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील लहान मुलांनी केक कापून सुंदर गीत सादर करून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसा साठी होणारा अनावश्यक खर्च टाळत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. म्हस्के साहेब यांनी वाढदिवसावर होणारा बोगस खर्च टाळून त्या ऐवजी मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत गावातील प्राथमिक शाळेसाठी स्लोगन,रंग रंगगोटी, करण्यासाठी ५००० रुपये रोख स्वरूपात शाळेचे मुख्याध्यापक मचे सर यांच्याकडे दिले.यावेळी कासार पिंपळगाव गावच्या सरपंच सौ.मोनालीताई राजळे,उपसरपंच आशाताई तिजोरे, सदस्या योगिताताई भगत, ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब राजळे,संभाजी राजळे,प्राथमिक शिक्षक तुषार तुपे, योगेश नजन, माऊली हरार, सुभाष राजळे,तुकाराम कांबळे,संतोष लवांडे,अशोक तिजोरे,प्रमोद तिजोरे,हे आवर्जून उपस्थित होते. परीसरातील इतर नागरीकांनीही हा आदर्श घेऊन वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन तो खर्च शाळेला देणगी स्वरुपात देण्यात यावा अशी विनंती करण्यात येत आहे.

























