पाथर्डी पोलिस स्टेशनच्या वतीने मीरी येथे विरभद्र मंदिरात ग्रामीण पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न
(अहिल्यानगर प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्हा क्राईम रिपोर्टर सुनिल नजन यांच्या पुढाकाराने पाथर्डी पोलिस स्टेशनच्या वतीने मीरी येथील विरभद्र मंदिरात ग्रामीण पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली गुरूवार दिनांक १५ जानेवारी रोजी रात्री हा सन्मान सोहळा संपन्न झाला.पाथर्डी पोलिस स्टेशनला तालुक्यातील सर्व पत्रकारांचे सहकार्य मिळते म्हणून तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत होते तसेच तालुक्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिस अधिकारी हे डोळ्यात तेल घालून पहारा करीत मेहनत घेतात तरीही काही राजकीय नेते मंडळी पोलिसांच्या कामावर टीका करतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संपूर्ण पाथर्डी तालुक्यात कोठे काही गैरप्रकारा संबंधी काही समस्या असतील तर पत्रकारांनी त्या समस्या बातमी प्रसिद्ध करण्या अगोदर ते पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत त्याच्यावर निश्चितच उपाय योजना केली जाईल असे त्यांनी सांगितले.पत्रकार सुनिल नजन यांच्या पुढाकाराने पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील पत्रकारांचा सन्मान करण्याचा योग आला असून सर्व पत्रकार बंधुंची या निमित्ताने नावानिशी ओळख झाली असे पुजारी साहेब यांनी सांगितले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत माझे वडील हे मीरी येथील औट पोस्ट मध्ये पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यावेळी मला मीरी येथील शाळेत शिकण्याचा योग आला होता.त्या अनेक वर्ग मित्रांपैकी गवळी, तोगे, वीर, कुटे, परीवारातील मित्रांची नावं सांगून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.या सन्मान सोहळ्यासाठी जिल्हा क्राईम रिपोर्टर सुनिल नजन,सचिन नंन्नवरे,वजीर शेख,रमेश पाथरकर, अंबादास गोरे, संतोष नंन्नवरे,सागर वीर, पोलिस कॉन्स्टेबल संभाजी कुसाळकर, भगवान टकले आणि गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.नंतर पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी करंजी येथे जाऊन तेथेही अशोक मोरे,विलास मुखेकर,भिवसेन टेमकर, तुळशीदास मुखेकर या पत्रकारांना सन्मानित केले.

























