दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील चोपडा महाविद्यालयात ‘Capacity Building of Teachers’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उत्साहात उदघाटन

( शिक्षकाने स्पर्धेत टिकण्यासाठी तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून ज्ञान अद्ययावत ठेवणे काळाची गरज’-*प्रो. आशुतोष पाटील )
चोपडा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव पीएम -उषा, नवी दिल्ली अंतर्गत तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा यांच्यातर्फे ‘Capacity Building of Teachers’ या विषयावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या सुरुवातीला माजी शिक्षणमंत्री कै.मा.ना.अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच वृक्षपूजन, वृक्ष जलार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे होते. याप्रसंगी कार्यशाळेचे उदघाटक व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव निरंतर अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. आशुतोष पाटील तसेच प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, कार्यशाळा समन्वयक उपप्राचार्य डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. एम. बागुल यांनी केले.या कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत त्यांनी आर्टीफिसीयल इंटेलिजन्स,मुक्त लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमसह विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
सदर कार्यशाळेमध्ये विविध महाविद्यालयांमधील 30 प्राध्याकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये महाविद्यालया सह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी उदघाटन पर मनोगत व्यक्त करतांना उदघाटक प्रो. डॉ. आशुतोष पाटील म्हणाले की, ‘शिक्षण हाच सामर्थ्यवान शब्द आहे. आधुनिक काळात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्राध्याकां मधील कौशल्ये विकसित करून शिक्षणाचा पाया मजबूत करण्याची गरज आहे. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील दरी दूर करण्यासाठी तांत्रिक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. अध्ययन व अध्यापन पद्धतीत बदल करावा व विद्यार्थ्यांच्या स्थिती गतीचा विचार करावा. शिक्षकाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ज्ञान सातत्याने अद्ययावत करणे काळाची गरज आहे’.
प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. पी. एम. रावतोळे यांनी केले,डॉ सौदागर यांनी सेशन कोऑर्डीनेशन केले, आभार डॉ. जे. जी. पाटील यांनी मानले.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विविध समिती प्रमुख व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत विद्यापीठ परिसरातील बहुसंख्य शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहभाग नोंदविला.

















