Home महाराष्ट्र बोगस पत्रकार आणि बोगस वृत्तपत्रांचा अहिल्यानगर जिल्ह्यात सुळसुळाट,पीत पत्रकारिता करणाऱ्या बोगस पत्रकारावर...

बोगस पत्रकार आणि बोगस वृत्तपत्रांचा अहिल्यानगर जिल्ह्यात सुळसुळाट,पीत पत्रकारिता करणाऱ्या बोगस पत्रकारावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार संघटनेची मागणी? 

बोगस पत्रकार आणि बोगस वृत्तपत्रांचा अहिल्यानगर जिल्ह्यात सुळसुळाट,पीत पत्रकारिता करणाऱ्या बोगस पत्रकारावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार संघटनेची मागणी?

 

 

 

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) आज समाजात पत्रकारितेची व्याख्याच बदलण्याचा खटाटोप काही बांडगूळांनी सुरू केला आहे.अनेक वर्षाच्या आपल्या अनुभवातून आणि निर्भीड लेखनीतून ज्यांनी अनेक वर्षे मोठमोठ्या दैनिकात खेड्यातील वार्ताहर म्हणून काम केले.आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर पत्रकारिता हे क्षेत्र नावारुपास आणले त्यांनाच अधिकृतपणे वार्ताहर म्हणून काम करण्याची मोठमोठ्या वृत्तपत्रांनी संधी उपलब्ध करून दिली अशा वार्ताहार बंधूंच्या अथक परीश्रमातून ग्रामिण भागातील पत्रकारिता खऱ्या अर्थाने उभी राहिली आहे.ज्या ग्रामीण भागातील वार्ताहरांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आणि आपल्या पत्रकारीतेला सर्व जनमानसात वेगळी अशी खास ओळख निर्माण करून दिली आहे त्या पत्रकारांची आता अवहेलना सुरू झाली आहे. काही महिन्या पासून लग्नात शूटिंग करणारे महाभाग देखील अचानक पत्रकार म्हणून पुढे येऊ लागल्याने खऱ्या पत्रकारांची गळचेपी होत आहे.पावसाळ्यातील भुईछत्रा प्रमाणे कोणीही उठून स्वतः ला पत्रकार म्हणून मिरवून घेऊ लागल्याने खऱ्या राजकीय लोकांना देखील पत्रकारांचे अजिबात महत्त्वच राहिले नाही.प्रत्येकाने पत्रकार म्हणजे काय याचं भान ठेवणं हे देखील अतिशय महत्त्वाच आहे.शूटिंग काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल म्हणजे आपण फार मोठे कायदेयज्ञ पत्रकार झालो आहोत असा खोटा आव आणून कोणी पत्रकार होत नसतो हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यां लोकांनी लक्षात ठेवावे. दोन नंबर धंदे करणारे सुद्धा आता गळ्यात आयडेंटी कार्ड घालून पत्रकार म्हणून मिरवून घेऊ लागले आहेत.गेल्या काही महिन्यापासून अशा काही बोगस पत्रकार म्हणून मिरवून घेणाऱ्या लोकांना समाजात फारच उत आला आहे.जे रात्रीतून पत्रकार म्हणून जन सामान्यांमध्ये मिरवत आहेत त्यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रातील जर्नालिझम मधिल कोणती पदवी घेतली आहे याची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या पायावर लोटांगण घालत त्यांच्या गाडीखाली चालणारे श्वान सुद्धा खऱ्या पत्रकारांना मागे सारून पुढाऱ्यांच्या पुढे पुढे जाऊन फोटो काढण्याचा लाळघोटेपणा करीत आहेत.त्यांनी तो जरूर करावा पण खऱ्या पत्रकारांच्या पत्रकारीतेला आपल्या मुळे ठेच पोहचू नये याचं भान ठेवणं आवश्यक आहे. पण आज तसे होताना दिसत नाही.सहा जानेवारी हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा दिवस.या दिवशी पत्रकार दिनाच्या निमित्ताने अनेक सुज्ञ नागरिका कडून, वाचकांकडून, नेत्यांकडून, जेष्ठ पत्रकार,निर्भिड पत्रकार यांचे चांगल्या कामामुळे गुणगान करीत कोडकौतुक झाले तर काही बोगस पत्रकार आणि वृत्तपत्रे यांच्या विरोधात संताप व्यक्त होताना दिसुन आला.पत्रकारीता ही समाजसेवा आहे.आज समाजात जात,पात, धर्म,व पक्षिय राजकारणा पलिकडे जाऊन सत्य मांडणारी खरी पत्रकारिता असावी अशी सर्व सामान्य जनतेची धारणा असते.पत्रकार कसा असावा तर तो कोणत्याही विशिष्ठ जाती पातीला खतपाणी घालणारा नसावा.तर तो सर्व धर्म समभातून समाजहीत जोपासणाऱ्या पत्रकारितेचा पुरस्कार करणारा खरा पुस्कारार्थी पत्रकार असावा.परंतू काही ठिकाणी पत्रकारितेची नितीमुल्ये पायदळी तुडवून पत्रकारिता केली जात आहे. आणि पत्रकारितेला बदनाम केले जात आहे.संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांची हुजरेगिरी करत स्वतःच्या स्वार्थासाठी पुढाऱ्यांची स्तुती गायन,भाटगीरी,करत बातम्या लिहिणारे तथाकथित पत्रकार आज स्वतःला प्रतिष्ठीत पत्रकार म्हणून मिरवून घेत समाजात वावरताना दिसत आहेत.सत्य बातम्या लिहिण्या पेक्षा फक्त सत्काराला अधिक महत्व देणारे आणि लिहीण्यापेक्षा फक्त पोपटपंची करत फक्त बोलण्यावर भर देणाऱ्या प्रवृत्ती याच खऱ्या पत्रकारितेची नितीमुल्ये पायदळी तुडवत आहेत.फक्त गळ्यात आयडेंटी कार्ड घालून सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, इच्छीत काम न झाल्यास बदनामीची धमकी देणे हे खऱ्या पत्रकारीतेच्या कक्षेत येत नाही हे सत्य आहे. लेखनीची भाषा न समजणारे अनेक बोगस पत्रकार आज समाजात वावरताना दिसतात हीच खऱ्या पत्रकारांची शोकांतिका आहे. “बघताना” हा शब्द मराठी भाषेच्या शब्द कोषातच कुठेच नाही त्या ऐवजी “पाहताना” या शब्दाचा वापर केला पाहिजे परंतु पत्रकारीतेची जाणिव नसल्याने अनेक जण “बघताना” हा शब्द लिहिताना दिसतात या वरून स्पष्ट होते की त्या लोकांचे ज्ञान किती शुष्क आहे.अशा बोगस पत्रकारांच्या गैर कारभारामुळे निर्भीड,वस्तूनिष्ठ आणि प्रमाणिक बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांची आज समाजात गळचेपी आणि मानहाणी होत आहे.अशा या बोगस आणि बांडगूळी पत्रकारीते मुळे सर्व सामान्य जनतेचा पत्रकारिते वरील विश्वास उडत चालला आहे ही खऱ्या पत्रकारांच्या द्रुष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. दुसऱ्याच्या ट्रू काॅपीवर पत्रकार असल्याचा आव आणणाऱ्या अशा बोगस पत्रकारांना आळा बसला पाहिजे.आज समाजातील खऱ्या पत्रकारांची नोंदणी,ओळख आणि पत्रकारीते मधिल नितीमुल्यांच्या आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे ही त्यांच्या कडून जनतेची अपेक्षा असते.परंतू आज बोगसगीरी मुळे तसे होत नाही.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिलेल्या नितीमुल्या पैकी निर्भिडता,सत्य आणि समाज प्रबोधन या वाटेने पत्रकारांनी चालणे अत्यंत गरजेचे आहे.पण आज त्याच्या उलट होताना दिसत आहे ही खरी शोकांतिका आहे.अनेक भुरटे लोक हे पत्रकार म्हणून नुसता आयडेंटी कार्डचा गैर वापर करीत आहेत.अनेक भामट्याकडे पत्रकारीते मधिल कोणत्याही प्रकारची पदवी प्राप्त नसताना ते स्वतः ला पत्रकार म्हणून मिरवून घेत आहेत.आणि समाजाची दिशाभूल करीत आहेत.राजकिय पुढाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला खऱ्या पत्रकारा पेक्षा अनेक बोगस पत्रकारांचाच जास्त भरणा असतो ही आजची खरी वस्तुस्थिती आहे.शिक्षकांना पत्रकारिता करता येत नाही हा औरंगाबाद (संभाजी नगर) येथील खंडपीठाने निकाल दिलेला असतानाही अनेक महाभाग शिक्षक हे पत्रकारिता क्षेत्रात लुडबुड करताना दिसत आहेत.अशा शिक्षकांवर शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.काही शिक्षक हे स्वतःला संपादक म्हणूनही मिरवून घेत आहेत.व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे हारतुरे घेऊन खऱ्या पत्रकारांच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावून मीच खरा पत्रकार असल्याचा खोटा आव आणत आहेत‌.ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपल्या वयाची वीस पंचवीस वर्षे ईमाने इतबारे काम केले लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे त्या खऱ्या पत्रकारावर आज हा घोर अंन्याय होत आहे.महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यानी जसे बोगस दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र काढून शिक्षकांच्या सरकारी नोकरीवर डल्ला मारून नोकरी केली म्हणून त्या शिक्षकावर चौकशी अंती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अगदी त्याच प्रमाणे पत्रकार म्हणून मिरवून घेणाऱ्या व पत्रकारीता क्षेत्रात अतिक्रमण करून घुसलेल्या घुसखोर शिक्षकांची चौकशी करून त्यांची शिक्षण क्षेत्रातून तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी जेष्ठ पत्रकार संघटनेची मागणी आहे.आज सोशल मिडियाच्या जमाण्यात कोणीही मोबाईल वर चार ओळी लिहून स्वतःला स्वयंघोषित पत्रकार म्हणून मिरवून घेत आहे. ही खऱ्या पत्रकारांची गळचेपी होत आहे ही खरी वस्तुस्थिती आहे. आजच्या मीतीला पित पत्रकारांना वेसन घालने ही काळाची गरज बनली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात बोगस पत्रकार आणि बोगस वृत्तपत्रांचा सुळसुळाट झाला असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्रातील अनेक दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके,मासिके यांना केंद्र सरकारने रजीस्टर केलेला ( RNI )हा नंबर नसतानाही अनेक ई वृत्तपत्रे, बोगस पद्धतीने बातम्या छापून त्या सोशल मीडियावर टाकत आहेत.अशा बोगस वृत्तपत्रांवरही कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.प्रत्येक जिल्ह्याला “जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय” आहे. ते फक्त नावालाच उरले आहे.दस्तुरखुद्द जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनाच आपल्या जिल्ह्यात किती नोंदणीकृत वृत्तपत्रे आहेत हे सांगता येत नाही ही खरी परीस्थिती निर्माण झाली आहे.ज्या पत्रकारांनी वृत्तपत्र क्षेत्रात आपली स्वतःची संपूर्ण हयात घालवली ते मात्र उपेक्षितच राहिले असुन बोगस पत्रकारच पत्रकार परिषदेला हजेरी लावत आहेत.प्रत्येक नवीन पत्रकारांच्या पत्रकारिता क्षेत्रातील जर्नालिझम मधिल पदव्या तपासल्या तर किती खरे पत्रकार आहेत हे वास्तव उजेडात येणार आहे.आणि बोगस पत्रकारांना आळा बसणार आहे. राजकीय पुढाऱ्यांचे जनसंपर्क अधिकारी यांनी सुद्धा खऱ्या पत्रकारांच्या पत्रकारीतेला ओळखूनच निमंत्रणे दिली पाहिजेत.उगाचच उठ सूट कोणालाही पत्रकार म्हणून जवळ उभे करून आपलं हसू करून घेउ नये.तर पत्रकार नसनाऱ्यांना खड्यासारखे बाजूला सारून दूर ठेवावे हेच आजच्या काळात शहाणपणाच ठरेल हीच खरी अपेक्षा आहे.

Don`t copy text!