वाघोली सोसायटीच्या चेअरमन पदी घुले पाटील गटाचे पांडुरंग दातीर यांची बिनविरोध निवड

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) सहकार महर्षी स्व.मारुतराव घुले पाटील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवून स्थापन केलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेरमन पदी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या गटाचे नेते पांडुरंग दातीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून संपूर्ण शेवगाव तालुक्यात पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.शेवगाव तालुक्या मध्ये सहकारातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या आणि अतिशय महत्त्वाच्या म्हणून गणल्या गेलेल्या सहकारी सोसायट्या पैकी वाघोली येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा समावेश होतो. ही सोसायटी वडुले खुर्द,चव्हाणवाडी आणि वाघोली या गावाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे.अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नव निर्वाचीत चेरमन व शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सोसायटीचा कारभार उत्तम रीत्या सुरू आहे.या सोसायटीने आपल्या कार्यक्षेत्रात शेतकरी हीताच्या अनेक योजना राबवून तालुक्यात नावलौकिक मिळविला आहे.अनेक शेतकऱ्यांना शेती विकासासाठी कर्ज देऊन शेतकऱ्यांच्या प्रपंचाला हातभार लावला आहे.ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक वाघोलीचे निवृत्ति पाटील दातीर आणि वडुले खुर्द येथील कारखान्याचे माजी संचालक साहेबराव पाटील आंधळे यांचा या सोसायटीला नेहमीच वरदहस्त लाभलेला आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ राजश्रीताई घूले आणि शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितीज घुले पाटील यांनी नुतन चेरमन पांडुरंग दातीर यांचे अभिनंदन केले आहे.शेवगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात ही निवडणूक बिनविरोध पार पडली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कु.देशपांडे मॅडम यांनी काम पाहिले.त्यांना वाघोली सोसायटीचे सचिव बलभीम मोरे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि वाघोली गावाच्या कार्यक्षेत्रातील सर्व राजकीय पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पांडुरंग दातीर यांच्या नावाची चेरमन पदासाठी सुचना मांडण्यात आली होती.त्यांच्या नावाला सर्व संचालक मंडळाने हिरवा कंदील दाखवत संम्मती देऊन ही निवडणूक बिनविरोध पार पाडली.भविष्यात संस्थेचे कामकाज करताना संस्थेच्या सर्व सभासदा विषयी कोणत्याही प्रकारचा आकस न धरता गट तट विसरून स्वच्छ कारभार करून घुले पाटील यांनी घालून दिलेला आदर्शाची काटेकोरपणे अंमलबजावणी करू अशी ग्वाही नवनिर्वाचित चेरमन पांडुरंग मुरलीधर दातीर पाटील यांनी दिली.ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून गावातील नेते पंडीतराव भालसिंग, भरतराव वांढेकर, दिनू तात्या फुंदे यांनी विशेष सहकार्य केले.























