पैठणच्या पाटेगाव पुलाखाली अनोळखी ईसमांचे प्रेत
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाटेगाव पुलाखाली अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे.सदर मयत झालेल्या अनोळखी इसमाचे अंदाजे (वय२५वर्षे) असुन त्याच्या अंगामध्ये काळ्या रंगाचे जॅकेट आहे. आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे.उजव्या कानात सोनेरी रंगाची बाळी आहे.गळ्यात काळे मणी असलेली मॅग्नेट ची माळ आहे. सदर प्रेत हे पैठण पोलिस स्टेशनच्या हद्दीत पाटेगाव येथील पुलाखाली मिळून आले आहे.अशा आशयाचे वर्णन असलेला पुरुष जातीचा मृतदेह मिळून आल्याने पंचक्रोशीत सर्वत्र खळबळ उडाली आहे.सदर आशयाचे वर्णन असलेली व्यक्ती कोणाच्याही ओळखीची असेल तर संभाजी नगर जिल्ह्यातील पैठणच्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक गोमारे साहेब यांच्या पुढील
मोबाईल नंबर वर (9049980755) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

























