Home पाचोरा तालुका स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र डोंगरगाव स्थापनेला 11 वर्ष पूर्ण

स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र डोंगरगाव स्थापनेला 11 वर्ष पूर्ण

स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र डोंगरगाव ता.पाचोरा येथे स्थापनेला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्वामी समर्थांच्या प्रतिमेचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. डोंगरगाव येथे 22 ऑगस्ट 2010(वार-रविवार) या दिवशी केंद्राची स्थापना करण्यात आली.केंद्रात बेटी बचाव बेटी पढाव,वृक्षारोपण, विविध सण-उत्सव साजरे करून संपूर्ण गाव या निमित्ताने एकत्र येतात . आज पालखी सोहळ्यात सहभागी स्वामी सेवा केंद्राचे सहकारी बंधू -भगिनी गणेश भजनी मंडळ,दीपक पाटील, दीपक वाळके,भानुदास सावळे,समाधान सावळे ,नाना वाळके ,समाधान इजारे,योगेश कळवत्रे, राहुल गुजर,रामेश्वर बडक,दिनेश आवारे,ज्ञानेश्वर वखरे,जितेंद्र सावळे, मुकेश मापारी,महादू सावळे दगडू वखरे विजू बाबा सावळे गावातील विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते

Don`t copy text!