भव्य दिव्यांग शिबिर – जयपूर फुट २०२५ यशस्वी
छत्रपती संभाजीनगर : श्री महेंद्र बेराड|(तालुका प्रतिनिधी)जे.जे. प्लस हॉस्पिटल व जे.आर. फाउंडेशन यांच्या वतीने, साधू वासवानी मिशन पुणे तसेच जायंट्स ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त सहकार्याने जे.जे. प्लस हॉस्पिटल परिसरात भव्य दिव्यांग शिबिर – जयपूर फुट २०२५ चे आयोजन करण्यात आले.
“आपला देश अपंगमुक्त व्हावा हा एकच संकल्प..!” या ध्येयाने आयोजित या शिबिरात एकूण ३६० दिव्यांग बांधवांचे कृत्रिम हात-पाय बसविण्यासाठी माप घेण्यात आले.
शिबिरात न्यूरोसर्जन डॉ. जीवन राजपूत व त्यांची वैद्यकीय टीम, साधू वासवानी मिशन पुणेचे मिलिंद जाधव व सुनील जैन, तसेच जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र पटेल, सचिव शीतल राजपूत, कोषाध्यक्ष विष्णू राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय विक्रांत श्रीवास्तव (हरिवंशराय बच्चन बहुउद्देशीय संस्था,जालना), नीतू भट्ट शिंदे (लायन्स एंजेल्स क्लब), मनीषभैया श्रीवास्तव (जिल्हा उपप्रमुख, शिवसेना) व गणेश हिवाळे (महामंत्री, भाजप गंगापूर तालुका) यांचीही विशेष उपस्थिती होती.
शिबिराचे सूत्रसंचालन गुरुदत्त राजपूत यांनी केले. दिव्यांग बांधव व सर्व अतिथींसाठी उत्तम अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले की –
> “हा उपक्रम केवळ सेवा कार्य नसून मानवतेचा खरा आदर्श आहे. प्रत्येक दिव्यांगाला आत्मविश्वास देऊन त्याला नव्या आयुष्याचा मार्ग दाखविणे हेच या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट आहे.”