पत्रकार खेमनर मारहाण प्रकरणातील सर्व आरोपीच्या मुसक्या आवळण्या साठी जिल्ह्यातील सर्व ग्रामिण पत्रकार संघटना जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार

पत्रकार खेमनर मारहाण प्रकरणातील सर्व आरोपीच्या मुसक्या आवळण्या साठी जिल्ह्यातील सर्व ग्रामिण पत्रकार संघटना जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) दैनिक खबरदार पुढारी चे संपादक दत्तात्रय खेमनर यांना चार गुंडाकडून ३० जुलै रोजी मारहाण झाली.याबाबद श्रीरामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन एक आठवडाही उलटून गेला तरी पोलीसांच्या अकार्यक्षम कारभारामुळे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत.त्यांच्या मुसक्या आवळण्या साठी जिल्ह्यातील सर्व ग्रामिण पत्रकार संघटना जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांची भेट घेऊन संबंधित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. दिनांक ३० जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान पत्रकार दत्तात्रय खेमनर हे त्यांच्या चारचाकी वाहनातून श्रीरामपूरच्या दिशेने जात असताना पाठीमागून एका दुचाकीवरून आलेल्या चौघांनी १)रत्नेश गुलदगड,२)मनिष मुथ्था,३) रोहित शिंदे ४) सावकार अमोलीक यांनी मोठ्या आवाजात आरडाओरडा करून खेमनर यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत तु जास्त माजलाय का? तू प्रकाश अण्णा चित्ते यांच्या विरोधात बातम्या छापतो का? असे म्हणत पत्रकार खेमनर यांच्या चार चाकी वाहनावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके फेकून गाडीच्या काचा फोडल्या होत्या.हा लोखंडी रॉड फेकल्या मुळे रस्त्याने पायी जाणाऱ्या प्रवाशांना लागून एखाद्याचा जीव जाईल याची जाणीव असतानाही प्रकाश चित्ते आणि सुनिल मुथ्था यांच्या सांगण्यावरून रत्नेश गुलदगड, मनिष मुथ्था, रोहित शिंदे,सावकार अमोलीक यांनी सदरचे क्रुत्य केले होते.या बाबद संपादक दत्तात्रय खेमनर यांनी श्रीरामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ७२४/२०२५ भादवी कलम ११०,३५१(२),३(५) आणि पत्रकार संरक्षण कायदा सन२०१९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.सदरच्या गुन्ह्याच्या कलमात महाराष्ट्र राज्यातील प्रसार माध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडीत असताना त्यांच्या वर होणाऱ्या हिंसक क्रुत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसार माध्यमातील व्यक्ती किंवा प्रसार माध्यम संस्था, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हाणी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम कलम ४अन्वये कलम वाढ करण्यात आली असल्याचे लेखी पत्र श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे स‌हाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव यांनी जारी केले आहे.या सर्व प्रकाराला चिथावणी देणारा चिथावणीखोर प्रकाश चित्ते याच्या विरोधात मागासवर्गीय महीलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात होता.या प्रकरणातील बातम्या खेमनर यांनी प्रकाशित केल्या म्हणून हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेला एक आठवडा उलटून गेला तरी श्रीरामपूर विभागाच्या पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या नाहीत ही पोलीसांच्या द्रुष्टीने अतिशय लांच्छनास्पद बाब आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला होऊनही पोलीसांच्या कामात दिरंगाई होत आहे.याबाबद श्रीरामपूर विभागातील पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामिण पत्रकार संघटना जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.आणि या गुन्ह्यातील आरोपींना पत्रकारांचाच जामीन अर्ज असल्याशिवाय जामिन देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येणार आहे.तसेच जिल्ह्यातील नगर, नेवासा, राहुरी,श्रीरामपूर आणि इतरही तालुक्यातील अनेक पत्रकारांवर या पुर्वी झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमून त्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांना सादर करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणीही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पत्रकार हे सुरक्षित नाहीत.हे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत घडलेल्या पत्रकार मारहाण प्रकरणा वरून दिसून येत आहे.पत्रकारावरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला पाहिजे अशी मागणी करण्यात येणार आहे.ग्रामिण भागात पत्रकारीता करताना अनेक गुंडगिरी करणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे.त्यांना पत्रकार संरक्षण कायद्यानुसार वेसन घालने अत्यंत गरजेचे झाले आहे.संशयित आरोपी मुथ्था आणि चित्ता यांनाही सह आरोपी करून त्याच्या वर ही कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनीही काहीच कारवाई केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकार संघटनांनी दिला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.पत्रकारावरील हल्लेखोर आरोपीवर कठोर कारवाई झाल्याशिवाय पत्रकारांना संरक्षण मिळणार नाही.अशी जिल्ह्यातील सर्व ग्रामिण पत्रकार संघटनेच्या पत्रकारांची मागणी आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.