३१ प्रवासी घेऊन जाणारी बस करंजी घाटातील खोल दरीत कोसळून १० जखमी नगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल, मध्यरात्री पाथर्डी पोलिसांची कामगिरी
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) एक खाजगी ट्रॅव्हल ३१ प्रवासी घेऊन पुण्याहून नांदेड कडे जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील खोल दरीत कोसळली होती आणि त्या मध्ये १० प्रवासी हे गंभीर जखमी झाले होते.त्यांना पाथर्डी पोलिसांनी नगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.व ईतर एकवीस प्रवाशांना तातडीने दुसरी गाडी बोलावून घेऊन नांदेड कडे पाठवून दिले आहे.पाथर्डी पोलिसांनी रात्रभर जागवून ही कामगिरी केली आहे.त्यमुळे पाथर्डी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या बाबतची घटना अशी की दिनांक २४ जुलै रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शर्मा ट्रॅव्हल कंपनीची गाडी क्रमांक एम एच २६ एन ६६३० ही पुण्याहून नांदेड कडे ३१ प्रवासी घेऊन जात असताना पाथर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील करंजी घाटातील वळणावर रोडच्या खाली घसरून दहा ते पंधरा फुट खोल दरीत जाऊन कोसळत मध्येच झाडावर अडकली होती. या बाबतची खबर पाथर्डी पोलिसांना मिळताच इतक्या मध्यरात्री कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी आपल्या लवाजम्यासह आणि आवश्यक त्या फौजफाट्यासह करंजी घाट गाठला. खोल दरीत जाऊन बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सुरक्षितपणे दरीतून वर काढले. एकतीस प्रवाशापैकी दहा प्रवाशांची परीस्थिती अतिशय गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने नाजूक बनली होती.त्यांना तातडीने ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती आणि पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्या जखमी प्रवाशांमध्ये २ महीला,६ पुरुष, २चालक वाहक असे एकूण १० जखमींचा समावेश होता.या अपघातात सुदैवाने कोणीही मयत झाले नाही.इतर २१ प्रवाशांना पोलीसांच्या मदतीने दुसऱ्या ट्रॅव्हल कंपनीच्या बस मध्ये बसवून देउन बीड -नांदेडकडे रवाना केले.पाथर्डी पोलिस स्टेशनच्या हजरजबाबी कामगिरी मुळे अनेक प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.आणि मध्यरात्री देवदुत बणून आलेल्या पाथर्डी पोलिस स्टेशनच्या पोलिसांना धन्यवाद दिले. ईतरवेळी पोलीसांच्या नावाने शिमगा करणाऱ्या महाभागांना ही सनसनीत चपराक पाथर्डी तालुक्यातील पोलिसांनी लगावली आहे.आणि त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून पर्दाफाश केला आहे.पोलीसांच्या या कामगीरी मुळे बसमधील सर्व प्रवाशांनी पाथर्डी तालुक्यातील पोलिसाची प्रशंसा केली आहे.

























