आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे शिरसगाव येथे आयोजन
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) २२१ नेवासा विधानसभा मतदार संघातील ना. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार विठ्ठलराव वकिलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शिरसगाव येथील जगदंबा माता मंदिरा समोरील मैदानात आमदार लंघे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांचे शिंदे शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे पाटील आणि अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.लंघे पाटील आमदार झाल्या नंतरचा हा पहीलाच अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे.नेवासा तालुक्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट)आणि मित्र पक्षाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नेवासा तालुक्यातील आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ आणि शिरसगाव ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे हे फक्त एकाच दिवसांसाठी आपल्या गावी उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी पुन्हा अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबई येथे रवाना होणार आहेत. तरी मतदार संघातील सर्व सामान्य जनतेच्या भेटीगाठी साठी आणि अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आमदार महोदय उपलब्ध होणार आहेत.बुधुवार दिनांक २ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजताच हा आमदार अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत आहे.