Home महाराष्ट्र तिसगाव येथील कल्याण मरकड खुन प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका, फटाक्याच्या आतषबाजीत गावात...

तिसगाव येथील कल्याण मरकड खुन प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका, फटाक्याच्या आतषबाजीत गावात जोरदार स्वागत

तिसगाव येथील कल्याण मरकड खुन प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका, फटाक्याच्या आतषबाजीत गावात जोरदार स्वागत

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि नेवासा तालुक्यातील पोलीसापुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण करणाऱ्या तिसगाव येथील कल्याण मरकड खुन प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पंकज राजेंद्र मगर याची दिनांक ५ जून २०२५ रोजी नेवासा न्यायालयाकडून जामीनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणातील ईतर दोन संशयित आरोपी इर्शाद जब्बार शेख आणि अमोल गोरक्षनाथ गारुडकर यांची मार्च आणि एप्रिल महिन्यातच जामिनावर सुटका करण्यात आली होती.पण मगर यांच्या बाबतीत मात्र नेवासा न्यायालयाने आता काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. या बाबतची माहिती अशी की दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता मयत कल्याण देविदास मरकड हा त्याचे जिवलग मित्र पंकज राजेंद्र मगर, इर्शाद जब्बार शेख, यांना भेटून येतो असे सांगून घराबाहेर पडला होता.तो रात्रभर घरी न आल्याने आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कोठेही ठावठिकाणा न लागल्याने त्याचा चुलत भाऊ प्रसाद मरकड याने कल्याण देविदास मरकड हा हरवल्या बाबद पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.त्या नंतर ४ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने फोन करून सांगितले होते की तुमच्या भावाची मिसिंगची बातमी हाॅटसाप वर प्रसिद्ध झाली होती त्या स्थीतीनुसारच नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथील नदीपात्रात तुमच्या भावाच्या शरीर यष्टीशी मिळते जुळते प्रेत नेवासा पोलीसांना मिळाले आहे.तुम्हाला त्यांचे फोटो व्हाटसाप वर टाकले आहेत.अशा प्रकारे माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी प्रवरा संगम येथील नदीपात्रात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती आणि ते प्रेत ओळखले होते.त्या नंतर तिन आरोपीच्या विरोधात दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी नेवासा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १०२९/२०२४ भादवी कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या फिर्यादीत नेवासा पोलिसांना आरोपींचा संशय आल्यामुळे कोणत्या तरी अज्ञात हत्याराने अज्ञात कारणास्तव फिर्यादी याच्या भावाचा खून केला अशा आशयाची फिर्याद नेवासा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.त्या नंतर नेवासा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलीसांच्या तपासात आढळलेल्या वरील तीन संशयित आरोपींनी ॲडव्होकेट असिफ लतिफ शेख राहणार जवखेडे खालसा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांच्या मार्फत नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुटकेसाठी आरोपीच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.सदर जामिनासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद होउन तो अर्ज न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींच्या काही अटी व शर्ती मान्य करून आरोपीच्या सुटकेसाठी जामिन अर्ज मंजूर केला आहे.आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट महेश तवले यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट असिफ लतिफ शेख यांनी काम पाहिले.असिफ शेख हे पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील जेष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट लतिफभाई इस्माईल शेख यांचे लाडके चिरंजीव आहेत. वडिलांचा यशस्वी वारसा मुलाने चालवून न्यायालयीन क्षेत्रात नाव उज्ज्वल केले आहे.या यशस्वी वाटचालीमुळे नेवासा आणि पाथर्डी तालुक्यातील जवखेडे पंचक्रोशीत ॲडव्होकेट असिफ लतिफभाई शेख यांचेही जोरदार स्वागत आणि कौतुक होत आहे.पंकज मगर हे तिसगाव ग्रामपंचायतींचे उपसरपंच होते त्यामुळे या प्रकरणी प्रचंड प्रमाणात राजकीय ढवळा ढवळ झाली होती. त्या मुळे मगर यांच्या जामिनासाठी न्यायालयात विलंब झाला होता.पंकज मगर यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांनी मात्र या जामिना नंतर जोरदार आनंदोत्सव साजरा केला आहे.

Don`t copy text!