Home पाचोरा वेब मिडीया असोसिएशन मुंबई च्या – जळगाव जिल्हा वेब असोसिएशन व पाचोरा...

वेब मिडीया असोसिएशन मुंबई च्या – जळगाव जिल्हा वेब असोसिएशन व पाचोरा वेब मिडिया असोसिएशन च्या कार्यकारणी पदाधिकारी चे भाजप तालुकाध्यक्ष युवानेते अमोलभाऊ शिंदे व डाॅ.भुषणदादा मगर यांचे शुभहस्ते सत्कार सोहळा संप

वेब मिडीया असोसिएशन मुंबई च्या – जळगाव जिल्हा वेब असोसिएशन व पाचोरा वेब मिडिया असोसिएशन च्या कार्यकारणी पदाधिकारी चे भाजप तालुकाध्यक्ष युवानेते अमोलभाऊ शिंदे व डाॅ.भुषणदादा मगर यांचे शुभहस्ते सत्कार सोहळा संपन्न

पाचोरा प्रतिनिधी : वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा व पाचोरा तालुका वेब मिडिया असोसिएशन घोषीत झाली आहे.

*वेब मिडिया असोसिएशन चे वेब पोर्टल चे असलेले पाचोरा पदाधिकारी पत्रकार व संपादक हे दिवस-रात्र हे सर्वांना मोठे करण्यासाठी आपली सेवा देत असतात आणि ते सर्व मंडळीची वेब मिडीया जिल्हा व तालुका असोसिएशन पदी निवड झाली म्हणुन आज त्यांचा सन्मान आम्ही करायला नको का ! हि कर्तव्यदक्षता व आपुलकीची भावना भाजप तालुकाध्यक्ष युवानेते अमोलभाऊ शिंदे व डाॅ.भुषणदादा मगर यांनी दाखवुन मोठ्या मनाने आज सर्व वेब मिडीया असोसिएशन चे पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार केले.*

*यावेळी बोलतांना युवानेते अमोलभाऊ शिंदे* यांनी सांगितले की पाचोरा तालुक्यातील पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या जोरावर आज जळगाव जिल्ह्यात मोठा ठसा उमटवला असुन *त्या सर्वांची निवड आमच्या सर्वांसाठी व विशेष माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.तर डाॅ. भुषणदादा मगर यांनी सर्व पत्रकार हे समाजासाठी आधारस्तंभ व एक खरा आरसा आहेत.* या अनुषंगाने आज पाचोरा भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष युवानेते अमोल भाऊ शिंदे यांनी वेब मिडीया असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांचे शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन निवड झाली म्हणुन सन्मानित केले तर डाॅ.भुषणदादा मगर यांनी सर्वांना पेढे भरवुन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

यावेळी वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ पाटील व जिल्हा सरचिटणीस गणेश शिंदे व जिल्हा सचिव नंदुभाऊ शेलकर व जिल्हा संघटक नरसिंह भुरे व जळगाव जिल्हा समन्वयक जावेद शेख जळगाव जिल्हा खजिनदार पदी -फोकस न्युज कार्यकारी संपादक भुवनेश दुसाने तालुका अध्यक्ष -एम एन न्युजचे निलेश पाटील उप तालुका अध्यक्ष -तालुका माझा संपादक बंडुभाऊ सोनार उप तालुका अध्यक्ष -सी एन आय महाराष्ट्र दिपक गढरी तालुका सचिव -झेप इंडियाचे संजय पाटील तालुका सरचिटणीस- झुम मराठी संपादक दिलीप परदेशी तालुका समन्वयक- जनलक्ष संपादक प्रमोद बारी ट्रेन लाइव्ह प्रवाशी संपादक दिलीप पाटील हे वेब असोसिएशन पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

सर्व निवड झालेले वेब मिडिया असोसिएशन चे पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी झेप इंडिया’चे योगेश पाटील यांनी सुत्रसंचालन केले.भाजप शहराध्यक्ष रमेश वाणी – भडगाव महेंद्रभाऊ ततार उपस्थित होते.यावेळी आमचा सन्मान व सत्कार केल्याबद्दल भाजप तालुकाध्यक्ष युवानेते अमोल भाऊ शिंदे व डाॅ.भुषणदादा मगर यांचे आभार वेब मिडीया असोसिएशन सर्व पदाधिकारी यांनी मानले आहे.

Don`t copy text!