Home पाचोरा शाळेत कॉपीमुक्त अभियानांतर्गत मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन

शाळेत कॉपीमुक्त अभियानांतर्गत मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन

शाळेत कॉपीमुक्त अभियानांतर्गत मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा येथे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजविण्याकरिता आणि परीक्षेविषयीची भीती दूर करण्याकरिता ‘कॉपीमुक्त परीक्षा ‘या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री आर. एल. पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री. पी. एम. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. एम. टी. कौंडिण्य सर, श्री. आर.बी. बांठिया सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस. पी. सूर्यवंशी मॅडम, सौ. एस. टी . पाटील मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते.

शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. आरती पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवून येणाऱ्या परीक्षेत आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासंबंधी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षेस तयार राहावे यासंबंधी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून मिळवलेले कमी गुण हे कॉपी करून मिळविलेल्या जास्त गुणांपेक्षा कधीही उत्तम असतात हे विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

याप्रसंगी विद्यार्थी येणाऱ्या बोर्ड परीक्षेस कॉपीमुक्त वातावरणात सामोरे जातील अशी शपथही विद्यार्थ्यांना देण्यात आली.

विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवून यशाकडे वाटचाल करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.

Don`t copy text!