Home महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्याचे किंग मेकर पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी केली अक्षय कर्डीलेचा अर्ज...

अहिल्यानगर जिल्ह्याचे किंग मेकर पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी केली अक्षय कर्डीलेचा अर्ज दाखल करण्या साठी तनपुरेंची मनधरणी 

अहिल्यानगर जिल्ह्याचे किंग मेकर पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी केली अक्षय कर्डीलेचा अर्ज दाखल करण्या साठी तनपुरेंची मनधरणी

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

२२२ राहुरी विधानसभा पोट निवडणुकी साठी उमेदवारी दाखल करण्याच्या आज शेवटचा दिवस होता. अहिल्यानगर जिल्ह्याचे किंग मेकर व भाजपाचे जेष्ठ नेते,जलसंपदा आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सोबत घेवून थेट राहुरी येथे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे सांभाव्य विरोधी उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली.आणि दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न करण्यासाठी त्यांची मनधरणी केली.त्यानंतर लगेचच राहुरी तालुक्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली.दिवसभर अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या.तनपुरे हे अर्ज दाखल करणार नाहीत ही बातमी वाऱ्या सारखी जिल्हा भर पसरली.तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांनी तनपुरे यांनी अर्ज दाखल करावा म्हणून प्रचंड आकंड तांडव केलं. तरीही अखेर आज शेवटच्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्जच भरलाच नाही.त्यामुळे राजकीय आखाड्यातील अनेक गावांतील कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.

तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे आता भाजपाचे उमेदवार अक्षय दादा कर्डीले यांना ही निवडणुक अतिशय सोपी झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी किंग मेकर ठरत विरोधकांना नामोहरम केले आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन उमेदवार शोधण्यासाठी धावपळ केली आणि गोविंदराव मोकाटे यांच्या नावाने एबी फाॅर्म दिला.आणि अर्जही दाखल केला आहे.अर्ज माघारीच्या दिवशी ९ एप्रिल या तारखे पर्यंत मोकाटे हे तग धरतील का हा प्रश्न मात्र आता सर्व सामान्य माणसाला भेडसावत आहे. मागिल पंचायत समिती निवडणूकीत गोविंद मोकाटे यांच्या सौभाग्यवती भाग्यश्री मोकाटे या नगर तालुक्यातील जेऊर पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या होत्या.परंतू पांगरमल दारू हत्याकांडामुळे त्यांची पण भाजपाने चांगलीच दमछाक केली होती.तेव्हा पासून मोकाटे कुटुंब हे अतिशय दुखावले गेले आहेत.ते शेवट पर्यंत उमेदवारी करणार का हे अर्ज माघारी च्या दिवशी उघड होणार आहे.

एक मात्र नक्की झाले की तनपुरेची उमेदवारीतून माघार घडवून आणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधकांना जोरदार शह दिला आहे.तनपुरे यांनी जरी माघार घेतली असली तरी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात अजूनही बरेच उमेदवार उभे राहिले आहेत.मुस्लिम समाजाची मते काहीही झाले तरी भाजपच्या उमेदवारांना मिळणारं नाहीत हे मुस्लिम समाजाने कार्यकर्ते खाजगीत ठणकावून बोलून दाखवत आहेत.ती मते आपल्या कडे आकर्षित करण्यासाठी भाजप नेते नेमकी काय खेळी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आज भाजपचे दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी, पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील,महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे,शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे,आष्टीचे आमदार सुरेश धस,श्रीगोंद्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,पाथर्डीचे जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे,एकनाथ आटकर,कुशल भापसे,पुरूषोत्तम आठरे,संभाजी वाघ,डॉ नरसाळे,नगरच्या महापौर ज्योती गाडे,जेष्ठ नेते भानुदास कोतकर, दादाभाउ चितळकर, यांच्या सह राहुरी पाथर्डी नगर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्या नंतर स्टेशन रोडवरील पांडुरंग मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या अमर रहे च्या घोषणा व मागिल आठवणींना उजाळा देताना अक्षय कर्डिले व त्यांच्या मातोश्री अलकाताई कर्डिले यांनी गळाभेट घेऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शेतकरी संघटनेतर्फे रविंद्र मोरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून गोविंदराव मोकाटे यांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. निवडणुकीच्या पुलाखालून अजून बरंच पाणी वाहून जाणार आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे.अर्ज दाखल केलेल्या इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपाने जोरदार फिल्डींग लावली आहे.

Don`t copy text!