Home जळगाव राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा खो-खो संघासाठी निवड चाचणी उत्साहात संपन्न….!!!!

राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा खो-खो संघासाठी निवड चाचणी उत्साहात संपन्न….!!!!

राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा खो-खो संघासाठी निवड चाचणी उत्साहात संपन्न….!!!!

 

जळगाव : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने सोलापूर येथे आयोजित ५२ वी कुमार / मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी जळगाव संघाची निवड चाचणी दिनांक २१ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या निवड चाचणीस महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव श्री जयांशू पोळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

 

यावेळी जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव श्री राहुल पोळ, श्री दत्तात्रय महाजन, श्री विशाल पाटील, श्री दिलीप चौधरी, श्री गोपाळ पवार, श्री कृष्णा लांबोळे, श्री हर्षल बेडीसकर, श्रीमती वर्षा सोनवणे, श्री निखिल पाटील, श्री छगन मुखडे, श्री केतन चौधरी तसेच श्री निरंजन ढाके आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या निवड चाचणीत जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, धरणगाव, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर व जामनेर या विविध तालुक्यांमधून एकूण ४९ मुलांनी व २७ मुलींनी सहभाग नोंदविला. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत निवड चाचणी रंगतदार केली.

 

संपूर्ण निवड चाचणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

Don`t copy text!