Home महाराष्ट्र भोकरदन येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ उत्साहात संपन्न

भोकरदन येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ उत्साहात संपन्न

भोकरदन येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ उत्साहात संपन्न

 

भोकरदन,दि.12(प्रतिनिधी महेंद्र बेराड) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि स्वातंत्र्यसेनानी पुंडलिक हरि दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आज उत्साहात संपन्न झाला. या रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथील सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व आणि उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी विशाल येवले, आयटीआयचे आयएमसी समन्वयक एस. एस. नाईक तसेच आर. डी. देशपांडे शिल्पनिदेशक यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोजगार मेळाव्यात विविध नामांकित संस्था व कंपन्यांनी सहभाग नोंदवून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. एकूण 103 उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या, त्यापैकी 55 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यामध्ये मोर्याश्री अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, भोकरदन यांनी 19 उमेदवार, परम कोचिंग क्लासेस, भोकरदन यांनी 13 उमेदवार, अर्थक्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, जालना यांनी 3 उमेदवार, इंडियन पब्लिक स्कूल, भोकरदन यांनी 3 उमेदवार, इंडियन अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, भोकरदन यांनी 4 उमेदवार, कैवल्य इंडस्ट्रीज, भोकरदन यांनी 1 उमेदवार तर क्रॉम्पटन ग्रीव्स, छत्रपती संभाजीनगर यांनी 12 उमेदवारांची निवड केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. एच. चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. अमोल परिहार यांनी मानले. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागातील अमोल बोरकर, आत्माराम दळवी, योगेश बहुरे, विशाल जगरवाल, दिपक पालवे तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकरदन येथील आर. खरात, व्ही. बरोटे, एस. अक्से, एन. पाचुंदे, आर. जाधव, एम. भिवसनकर, एस. शिरसाठ, एस. वाघ, एस. देशमुख, आर. जगदाळे, बी. राऊत, जी. भवर आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्या नियोजन केले.

Don`t copy text!