Home पाचोरा पाचोरा तालुक्यात ‘ स्व जनगणने’ला (Self Enumeration) उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रशासनाच्या आवाहनाला यश

पाचोरा तालुक्यात ‘ स्व जनगणने’ला (Self Enumeration) उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रशासनाच्या आवाहनाला यश

पाचोरा तालुक्यात ‘ स्व जनगणने’ला (Self Enumeration) उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रशासनाच्या आवाहनाला यश

 

 

 

पाचोरा: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात ‘स्व-गणना’ म्हणजेच Self Enumeration प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत असून ही मोहीम यशस्वी होताना दिसत आहे. मोठ्या संख्येने नागरिक स्वतःहून आपली माहिती नोंदवत आहेत. या कामाला गती देण्यासाठी पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी १ मे रोजी तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ केला होता.

 

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील १ मे ते १५ मे या कालावधीत चालणाऱ्या या ‘स्व-गणना’ कार्यक्रमात तालुक्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते.

 

स्व गणना या मोहिमेबद्दल माहिती देताना तहसीलदार विजय बनसोडे यांनी सांगितले की, “ही भारताची १६ वी जनगणना असून पहिली डिजिटल जनगणना आहे. या डिजिटल सुविधेचा लाभ घेणे, वेळेची बचत करणे, अचूक माहिती संकलित करणे आणि या राष्ट्रीय कार्यात लोकांचा सहभाग वाढवणे हा ‘स्व गणना’ प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे.”

 

 

पाचोरा तालुक्यात या मोहिमेला व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नागरिकांना आवाहन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने:भूषण अहिरे (प्रांत अधिकारी),बापू रोहोम (उपविभागीय पोलीस अधिकारी), राहुल कुमार पवार (पोलीस निरीक्षक), मंगेश देवरे (मुख्याधिकारी, नगर परिषद पाचोरा), सुधाकर मुंडे (गट विकास अधिकारी), तसेच धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगेश महाराज धामणगावकर, मौलाना जीशान रजा ,मौलाना नईम रजा, जिल्हा परिषद सदस्य राव साहेब पाटील,किरण काटकर, रफिक बागवान, शिक्षक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, विकास पाटील, विजय ठाकूर, जावेद रहीम इत्यादींनी नागरिकांना स्वतःहून आपली स्व गणना पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

 

प्रगणकांना प्रशिक्षण

 

१६ मे पासून सुरू होणाऱ्या ‘घरोघरी जनगणने’साठी (Door to Door Census) प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना गो. से. हायस्कूल पाचोरा येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रगणक कर्मचाऱ्यांनी देखील आपली स्वयं-गणना पूर्ण केली आहे. पाचोरा तालुक्याने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Don`t copy text!