Home महाराष्ट्र निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नात सोन्याच्या दागिण्यावर डल्ला मारणाऱ्या श्रीरामपूरच्या दोन...

निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नात सोन्याच्या दागिण्यावर डल्ला मारणाऱ्या श्रीरामपूरच्या दोन आरोपींच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नात सोन्याच्या दागिण्यावर डल्ला मारणाऱ्या श्रीरामपूरच्या दोन आरोपींच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

प्रसिद्ध किर्तनकार हरी भक्त परायण सौ.शालिनी, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि सौ. मनिषा, सुनिल विष्णू चिलप यांचे चिरंजीव साहील यांचा शुभ विवाह सोहळा दिनांक ३ मे रोजी गुंजाळवाडी येथे शंभर एकर जमीनीतील मंडपात मोठ्या थाटात संपन्न झाला होता. याच लग्नात श्रीरामपूर येथील चोरट्यांनी धुमाकूळ घालत काही सोन्याचे दागिने चोरले होते. पण पोलीसांनी तातडीने छडा लावून दोन आरोपींच्या तातडीने मुसक्या आवळल्या आहेत. याबाबची घटना अशी की, संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३६२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मुलीच्या विवाह स्थळी आयोजित ध्वजारोहण कार्याक्रमाच्या वेळी या गुन्ह्यातील फिर्यादी यांचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून बळजबरीने चोरुन नेले होते.

अहिल्या नगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती की,सदरचा हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सागर सुरेश कांबळे,राहणार रमाई नगर,वार्ड नं.१ श्रीरामपुर याने त्याच्या साथीदारा सह केला असुन तो त्याच्या साथीदारा सह चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी मोटार सायकलवर बसुन ममदापुर फाटा येथे येणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.म्हणून पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचुन दोन इसमांना ताब्यात घेतले होते. त्यांना त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) सागर सुरेश कांबळे,(वय३२ वर्षे) राहणार रमाई नगर,वार्ड नं.१ ,श्रीरामपुर, आणि २) बबलु उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय ३६ वर्षे) राहणार,वार्ड नं.२ , श्रीरामपुर असे असल्याचे सांगितले होते. ताब्यातील आरोपीकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करीत माहिती विचारली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा इतर साथीदार ३) आतिक आयुब उर्फ आरीफ शेख, राहणार ,वार्ड नं.२ श्रीरामपुर(फरार), ४) सनी विलास ढोकणे, राहणार,वार्ड नं.२ ,श्रीरामपुर (फरार) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिली होती.दरम्यान आरोपींच्या ताब्यातुन १,४९,५०० रुपये किंमतीचे ११.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, ७०,००० रुपये किंमतीचे दोन मोबाईल, ७०,००० रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकुण २ लाख ८९ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हे करीत आहेत.अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपी बाबत कोणाला काही माहिती असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर (०२४१) २४१६१११ किंवा डायल नंबर ११२ या नंबर वर कळविण्यात यावी असे आवाहन अहिल्या नगर जिल्हा पोलीसांनी केले आहे. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखर पुड्यात अफाट खर्च झाला होता म्हणून त्यांच्या वर टिकेची झोड उठवली होती आणि लग्नाच्या दिवशी काहींना तर जेवणच मिळाले नाही या संदर्भात अशा अनेक गमती जमती घडत असताना चोरट्यांनी थेट दागिन्यांवर डल्ला मारून आपला कार्यभाग साधला होता.या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, इतर मंत्री,संत महंत हे उपस्थित असताना अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरीही चोरट्यांनी थेट दागिन्यांवर डल्ला मारून पोलिस खात्यालाच आव्हान दिल्याने गृहखात्याची चांगलीच बदनामी झाली आहे.त्यामुळे आता पोलिस खाते खडबडून जागे झाले आहे.

Don`t copy text!