Home महाराष्ट्र पंडीत दीनदयाळ उपाध्याय भरती मेळाव्याचे 12 मे रोजी भोकरदन येथे आयोजन

पंडीत दीनदयाळ उपाध्याय भरती मेळाव्याचे 12 मे रोजी भोकरदन येथे आयोजन

पंडीत दीनदयाळ उपाध्याय भरती मेळाव्याचे 12 मे रोजी भोकरदन येथे आयोजन

 

भोकरदन दि.7,(महेंद्र बेराड): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकरदन, जि.जालना,यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 12 मे,2026 मंगळवार रोजी स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकरदन, जि.जालना, येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत सुशिक्षित महिला व पुरुष उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा तसेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण भरती मेळावा आयोजीत करण्यात येत आहे. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहुन व प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करणार आहे. सदर मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून 49 रिक्तपदे एसएससी, एचएससी, कोणतेही पदवीधर, व पदव्युत्तर 18 ते 45 वयोगटातील पात्रता धारक उमेदवारासाठी पदे उपलब्ध झालेली आहेत.

या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छूक महिला व पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावा. तसेच, उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, इ. कंपनींना देण्यासाठी सोबत ठेवावे. इच्छुक उमेदवारांनी अद्यापर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा यापुर्वी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील रिक्तपदे व पात्रते प्रमाणे मॅचिंग होणाऱ्या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करुन लॉगीन करावे आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 9.00 वाजता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या सदराखाली जालना जिल्हा निवडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यामधील तपशिल पाहावा. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02482-299033या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत-जास्त नोकरी उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Don`t copy text!