Home महाराष्ट्र मुंगुसवाडे येथे हाॅटेल मालकावर गावठी कट्टयाने फायर करून व कोयत्याने वार करीत...

मुंगुसवाडे येथे हाॅटेल मालकावर गावठी कट्टयाने फायर करून व कोयत्याने वार करीत खून करण्याचा प्रयत्न, आरोपी तात्काळ गजाआड

मुंगुसवाडे येथे हाॅटेल मालकावर गावठी कट्टयाने फायर करून व कोयत्याने वार करीत खून करण्याचा प्रयत्न, आरोपी तात्काळ गजाआड

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

मुंगुसवाडे, तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर येथील हाॅटेल मालकावर गावठी कट्टयाने फायर करून कोयत्याने वार करीत खून करण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपीस तात्काळ गजाआड करण्यात आले आहे. या बाबतची घटना अशी की बुधवार दिनांक ६ मे रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास फिर्यादी शक्तीमान महादेव खेडकर (वय वर्षे २४), राहणार, मुंगुसवाडे, तालुका, पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर हे त्यांच्या हाॅटेल मध्ये बसलेले असताना तेथे १) परशुराम मोहन गायकवाड,२) करण भारत जाधव,३) विठ्ठल सखाराम लष्करे व इतर दोन अनोळखी इसम असे पाच जण त्यांच्या कडे असलेल्या स्काॅर्पिओ व ब्रेझा गाडी मध्ये बसून येवून मुंगुसवाडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील फिर्यादीच्या “हाॅटेल मैत्री” मध्ये येऊन फिर्यादीला शिविगाळ,व दमदाटी करून विठ्ठल लष्करे याने फिर्यादी जवळ जाऊन तुला खुप जास्त झाले आहे.तुझा काटाच काढतो असे म्हणून फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील पिस्तूला मधुन फिर्यादीच्या दिशेने फायर केले.तेव्हा तो म्हणाला की “परशा गोळी अडकली,फायर होईना”असे म्हणाला असताना आरोपी परशुराम गायकवाड याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या गळ्यावर वार केला परंतु फिर्यादीने तो वार चुकवून तो तेथुन पळून गेला.त्यानंतर त्यांनी हाॅटेल मधिल टेबल,खुर्च्या, फ्रिज व काउंटरची तोडफोड केली.त्यांनी हाॅटेलच्या गल्ल्यातील पाच हजार रुपये काढून घेऊन त्यांच्या गाड्या मध्ये बसून निघून गेले.या बाबद पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४९१/२०२६ भारतीय न्याय संहितेचे २०२३ चे कलम १०९,११९(२), १८९(२),१९१(३),१९०,३२४(२), ११५(२),३५२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५),४(२५) प्रमाणे दिनांक ६ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील फिर्यादी वर हल्ला झाल्यानंतर फिर्यादी हे घटनास्थळा वरून बाजूला पळून जाऊन पोलीसांचा टोल फ्री क्रमांक ११२ या नंबरला फोन करून घटनेची माहिती दिली होती.तेव्हा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब,उप निरीक्षक विशाल लहाने,स.फौ. नितिन दराडे , पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, पोलिस कॉन्स्टेबल सागर बुधवंत,ज्ञानेश्वर ईलग,संजय जाधव,ईजाज सय्यद,इत्यादींनी तातडीने घटनास्थळी भेट देवून व फिर्यादी कडून आरोपीची माहिती काढून संशयित आरोपी विठ्ठल सखाराम लष्करे राहणार वाघोली, गाडीतळ, झोपडपट्टी,पुणे. मुळ राहणार, गांधीनगर, बीड, यास पाठलाग करून पकडले.त्याच्या कडून एक गावठी कट्टा,दोन जीवंत काडतुसे,जप्त करण्यात आली आहेत.ईतर आरोपींच्या शोधासाठी दोन पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आहे.त्याच्या कडून एक बेकायदेशीर गावठी कट्टा,दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.पाथर्डी पोलीसांच्या तात्काळ कारवाई मुळे परीसरातील गुन्हेगारामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदरची कारवाई ही अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब, यांच्या मार्गदर्शना खाली पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब,उप निरीक्षक विशाल लहाने,सहायक फौजदार नितीन दराडे,पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, पोलिस कॉन्स्टेबल सागर बुधवंत,ज्ञानेश्वर ईलग,संजय जाधव,ईजाज सय्यद यांच्या पथकाने केली आहे.पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील गावठी कट्टे जवळ बाळगणाऱ्यांची माहिती पोलिसांना मिळाली असुन गावठी कट्टे जवळ बाळगून धुमाकूळ घालणारे आता पोलीसांच्या “रडार” वर आले आहेत.

Don`t copy text!