लिनेस क्लब पाचोराची शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न: प्रा.सौ.जयश्री वाघ यांची क्लबच्या अध्यक्षपदी निवड
दिनांक २८ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी लायनेस क्लब पाचोरा येथे मा. प्रांत अध्यक्षा श्रीमती लता भाभी बनोट, लिनेस क्लब पाचोराच्या पॅरेंट क्लब अध्यक्षा श्रीमती रेखा वर्मा, मा. अध्यक्षा प्रेमलता खटोड व सचिव नीला चौधरी यांनी भेट दिली.
या प्रसंगी त्यांनी क्लबला मार्गदर्शन करताना नियमावली तसेच क्लब यशस्वीपणे चालविण्याची कार्यपद्धती समजावून सांगितली. बोर्ड मिटिंग संदर्भातील नियम, मीटिंगचे अजेंडा व नियोजन या विषयांवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
याच वेळी प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांची लिनेस क्लब पाचोराच्या अध्यक्षपदी, श्रीमती राजश्री जैन यांची सचिवपदी तर श्रीमती संगीता सिसोदिया यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांची शपथविधी समारंभपूर्वक पार पडली.
या बैठकीस लिनेस क्लबच्या सदस्या श्रीमती सौदामिनी पाटील, श्रीमती मोनिका थेपडे, श्रीमती अंकिता अग्रवाल, श्रीमती रूपाली पाटील व श्रीमती मंजुषा अग्रवाल उपस्थित होत्या.
पॅरेंट क्लब जळगाव लिनेस क्लबच्या मार्गदर्शन व सूचनांमुळे पाचोरा येथे लिनेस क्लब ऑफ पाचोरा ची स्थापना करण्यात आली असून, लायनेस क्लब पाचोराच्या वतीने पॅरेंट क्लब जळगाव लिनेस क्लबचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.






















