Home जळगाव दादासाहेब डॉ. सुरेश. जी पाटील महाविद्यालय, चोपडा येथे महारक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद...

दादासाहेब डॉ. सुरेश. जी पाटील महाविद्यालय, चोपडा येथे महारक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद (80 रक्त पिशव्यांचे संकलन)

दादासाहेब डॉ. सुरेश. जी पाटील महाविद्यालय, चोपडा येथे महारक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद (80 रक्त पिशव्यांचे संकलन)

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित ‘महारक्तदान शिबीर ‘ प्रचंड उत्साहात पार पडले. या रक्तदान शिबिरास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यावेळी ८० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. अशोक कदम व डॉ. पराग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. बी. सूर्यवंशी, प्रा. डॉ.आर. एम. बागुल , समन्वयक डॉ .शैलेशकुमार वाघ, प्रबंधक डी. एम. पाटील , व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. अभिजीत साळुंखे व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या शिबिरात रक्तसंकलन करणे करिता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून रक्त संक्रमण अधिकारी डॉ. विद्या शिरसाठ, डॉ. श्वेता वळवी, प्रदीप पाडवी, विनायक वैद्य व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. याप्रसंगी मान्यवरांचे व्यवस्थापन विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व आणि महात्म्य समजावून सांगितले तसेच प्राचार्य प्रा .डॉ.के.एन.सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात रक्तदानाची समाजासाठी गरज याबाबत मार्गदर्शन करताना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन बाविस्कर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन विभागातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Don`t copy text!