पाचोरा येथे संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन

पाचोरा येथे संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन

 

 

पाचोरा (संदीप तांबे )

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा येथे तीन दिवसीय भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज जयंती उत्सव समिती, पाचोरा यांच्या वतीने या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.

या कीर्तन सोहळ्याच्या पहिल्या दिवशी रविवारी (१ फेब्रुवारी) रात्री ८.३० ते १० या वेळेत ह.भ.प. सुधाकर महाराज मोटाळकर यांचे कीर्तन होणार असून यजमान म्हणून ह.भ.प. प्रविण उत्तमराव वाघ (बापुराव), कृष्णापुरी, पाचोरा राहणार आहेत.

सोमवारी (२ फेब्रुवारी) दुसऱ्या दिवशी ह.भ.प. डॉ. बालाजी जाधव (छत्रपती संभाजीनगर – गाथा चिंतन ट्रस्ट) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या दिवशीचे यजमान ह.भ.प. मनोज सुधाम पाटील (पूजा रोडलाईन्स), प्रेमनगर, पाचोरा हे असतील.

मंगळवारी (३ फेब्रुवारी) तिसऱ्या व शेवटच्या दिवशी ह.भ.प. ज्योतिबाई महाराज पाचोरकर (गाथा परिवार सदस्य) यांचे कीर्तन होणार असून यजमान म्हणून ह.भ.प. अनिल नथू मराठे, कोंडवाडा गल्ली, पाचोरा राहणार आहेत.

सर्व कीर्तन सोहळे रात्री ८.३० ते १० या वेळेत पार पडणार असून, हा कार्यक्रम आठवडे बाजार, कृष्णापुरी पुलाजवळ, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणी व प्रमुख सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले असून संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे.