Home महाराष्ट्र वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर डॉक्टरांचा मीरीतील राजयोग मंगल कार्यालयात सपत्नीक...

वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर डॉक्टरांचा मीरीतील राजयोग मंगल कार्यालयात सपत्नीक सन्मान सोहळा संपन्न

वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर डॉक्टरांचा मीरीतील राजयोग मंगल कार्यालयात सपत्नीक सन्मान सोहळा संपन्न

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ग्रामीण भागात काम करीत असताना वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मांन्यवर डॉक्टरांचा राजयोग मंगल कार्यालयातील व्यासपीठावर सपत्नीक सन्मान सोहळा संपन्न झाला.राजयोग मंगल कार्यालयाचे संचालक विजयजी कोरडे साहेब यांनी या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.वैद्यकिय क्षेत्रात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नवीन डॉक्टर हे शहरांत जाऊन आपला दवाखाना थाटतात.परंतू मीरी पंचक्रोशी तील अनेक गावांतील डॉक्टरांनी अनेक वर्षांपासून मीरी या गावातच आपली चांगली सेवा देऊन सामान्य जनमानसात आपल्या कार्याचा मोठा नाव लौकीक मिळवला आहे.आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात करताना मीरी पंचक्रोशी तील खेड्या पाडया तील गोरगरीब रूग्णांना अतिशय उपयुक्त अशी चांगली सेवा देण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अनेक रूग्णांचे प्राण वाचुन आशिर्वाद घेतले आहेत.या डॉक्टरांनी सपत्नीक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देऊन अनेक वर्षांपासून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवून लोकांच्या हृदयात वैयक्तिक स्थान निर्माण केले आहे.त्यामुळे त्यांच्या समाज सेवेच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शाल श्रीफळ,आणि वार्षिक दैनंदिनी देऊन त्यांचा एकत्रित रित्या सन्मान करण्यात आला.एकत्रीत रित्या सन्मान केल्यामुळे आम्हाला भविष्यात ही चांगले काम करण्यासाठी नविन उर्जा मिळाली असल्याचे एका महीला डॉक्टरांनी यावेळी सांगितले.हे डॉक्टर मीरी पंचक्रोशीत अतिशय नावाजले गेले आहेत.आजपर्यंत मीरी पंचक्रोशीतील डॉक्टरांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोणीही सन्मानित केले नाही परंतु कोरडे साहेब यांनी हा सन्मान सोहळा साजरा करून डॉक्टरा विषयी कृतज्ञता व्यक्त करून मोठा मान मिळवला आहे.ग्रामिण भागातील जनता डॉक्टरांना चांगले आरोग्य देणारे देवदुत म्हणून समजतात.या सन्मान सोहळ्यासाठी डॉ.विजय वेताळ, डॉ.बबनराव नरसाळे, डॉ.अविनाश दारकुंडे,डॉ विजया दारकुंडे, डॉ.अविनाश नरवडे,डॉ.जयश्री नरवडे,दत्ता देशमुख,डॉ. सौ.देशमुख,डॉ. शिवाजी जाधव, डॉ.जयश्री जाधव,आणि जेष्ठ नेते राजू मामा तागड हे आवर्जून उपस्थित होते.कोरडे साहेब यांच्या सुकन्या साक्षीताई याही डॉक्टर असल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या मुलभूत प्रश्नाची चांगली जाणीव आहे.या नंतर माजी सैनिकांनाही सन्मानित करण्यात येणार आहे असे विजयजी कोरडे साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Don`t copy text!