पारध येथील जनता विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेकींचा सन्मान

पारध येथील जनता विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेकींचा सन्मान

 

 

 

 

पारध शाहुराजे: (महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी)

पारध शाहुराजे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक प्रा. संग्राम देशमुख हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका शर्मिला शिंदे, श्रीमती विहार कदम, श्रीमती एम. एस. काळे व श्रीमती एल. एस. वानखेडे उपस्थित होत्या.

मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श ठेवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा “सावित्रीबाईंच्या लेकी” म्हणून गौरव करण्यात आला. हा सन्मान पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे, प्रा. नारायण पाटील, श्री राजेंद्र देशमुख व श्री एस. एच. बोर्डे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राजेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.