Home महाराष्ट्र बन्सल क्लासेस तर्फे निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

बन्सल क्लासेस तर्फे निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

बन्सल क्लासेस तर्फे निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोयगाव | प्रतिनिधी दत्तात्रय काटोले

 

 

 

 

बन्सल क्लासेसतर्फे ‘बडर्स ऑफ विसडम–३’ या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन रविवारी पं. न. लुकड कन्या शाळेत करण्यात आले. मागील तीन वर्षांपासून ही स्पर्धा सातत्याने घेतली जात असून पहिल्या वर्षी खानदेश व विदर्भातील इयत्ता ८ वी ते १० वीतील ३२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

 

 

 

 

यंदा “ग्रामीण विकास – भारताची पाठराखण करणारा मजबूत आधार” या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण सोनवणे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शन केले. बन्सल क्लासेसचे संचालक हेमंत अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. शुभम यांनी प्रास्ताविक केले, तर विशाल अग्रवाल यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 

 

 

स्पर्धेतील विजेत्यांना संचालक दिलीप अग्रवाल, समीर मोहिते व भाग्यश्री अग्रवाल यांच्या हस्ते रोख बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

स्पर्धेचे निकाल

 

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत

 

प्रथम – गौरी संजय आगे (शेंदुर्णी)

 

द्वितीय – कावेरी चौधरी

 

तृतीय – दीक्षा कासार

 

 

 

 

उत्तेजनार्थ बक्षिसे –

 

शुभवी श्रीवास्तव (भुसावळ), नम्रता पाटील, मयुरेश वानखेडे (धरणगाव), राजेश सोनवणे (अमळनेर), दामिनी वारुडे (शिरपूर)

 

 

 

 

सोयगाव व आमखेडा परिसरातून सर्व स्तरांतून सहभागी होत गौरी संजय आगे हिने जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

 

Don`t copy text!