आव्हाणे बूद्रुक येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत कार्तिक स्वामी दर्शन सोहळा संपन्न

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात निद्रिस्त गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बूद्रुक येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत कार्तिक स्वामी दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.वर्षभर कार्तिक स्वामींचे दर्शन बंद असते परंतु वर्षातून फक्त कार्तिक पौर्णिमेलाच यांचे दर्शन घेणे हे फलदायी ठरते अशी पौराणिक अख्यायिका प्रसिद्ध आहे.कार्तिक स्वामी हे महादेव पार्वतीचे पुत्र आहेत.परंतू ते त्यांच्या अंत्यत क्रोधित अवस्थे मुळे एकाकी पडले आहेत.ती पौराणिक कथा अशी आहे की एकदा महादेव पार्वती कार्तिक गणपती हे सर्व कुटुंब कैलास पर्वतावर एकांतात विश्रांती घेत बसलेले असताना पार्वतीच्या मांडीवर बसवण्याचा दोन्ही पुत्र कार्तिक स्वामी आणि गणपती यांनी हट्टच धरला होता.मग पार्वतीने सांगितले जो कोणी सर्वात अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा घालून प्रथम येईल त्याला मांडीवर बसवण्याचा मान मिळेल.मग कार्तिक स्वामी हे सर्वात अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा घालायला निघून गेले.विद्येचा अधिपती असलेल्या गणपतीने मात्र तेथेच थांबून महादेव पार्वतीला प्रदक्षिणा घालून प्रथम मांडीवर बसवण्याचा मान मिळवून पटकन मांडीवर जाऊन बसले.संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून दमलेल्या अवस्थेत कार्तिक स्वामी आले तर पाहतात गणपती हे प्रथम मांडीवर बसलेले होते.ते पाहून कार्तिक स्वामी अत्यंत रागाने क्रोधित होउन रूसून बसले.आणि रागाच्या भरात त्याचवेळी त्यांनी संपूर्ण स्री जातीलाच शाप दिला की ज्या स्त्रिया माझ्या कडे येतील त्या विधवा होतील. मग पार्वतीने कार्तिक स्वामी ची समजूत काढली आणि काही तरी उपःशाप द्यावा म्हणून विनवणी केली.त्याचवेळी कार्तिक स्वामी यांनी सांगितले की फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच जो कोणी माझं दर्शन घेऊन माझी मनोभावे पूजा करील त्यांचे सर्व मनोरथ,नवस पूर्ण होतील म्हणून सर्व स्त्रीयांना कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा प्रथम मान मिळतो. देशभरात कार्तिक स्वामीची अगदी बोटावर मोजता येतील एवढीच मंदिरे आहेत.पुण्यातील पर्वती टेकडीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्या जवळील पुणतांबा येथे आणि नेवासा तालुक्यातील क्षेत्र देवगड येथे आणि शेवगाव तालुक्यातील निद्रिस्त गणपती असलेल्या आव्हाणे येथेच ही मंदिरे अस्तित्वात आहेत.या दर्शन पर्वणी सोहळ्या निमित्ताने आव्हाणे येथे आळंदी येथील शिवचरित्राकार ह.भ.प. प्रतिभाताई महाराज दरेकर यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तर तेलकुडगाव येथील भाविक भक्त आसाराम भाऊसाहेब काळे पाटील यांच्या वतीने खिचडी फराळाच्या महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर या किर्तन सोहळ्याची सांगता झाली.या निमित्ताने पंचक्रोशीत अनेक महीलांनी या किर्तन सोहळ्यास हजेरी लावली होती.या किर्तन सोहळ्यास म्रुदुंगाचार्य अशोक महाराज कोळगे,गायक भागवत महाराज मरकड,नानाभाउ पवार,पेटी मास्तर शिवाजीराव मुटकुळे,भजनी मंडळातील रोहिदास खैरे,भाऊ चोथे, देविदास पंडीत, मुंबई आकाशवाणी चे माउली गुजर तसेच गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी, सरचिटणीस अर्जुनराव सरपते, कार्यालयीन सचिव लक्ष्मणराव मुटकुळे,विश्वस्त मंडळातील कारभारी तळेकर, रामदास दिवटे, नारायण जाधव, सुधाकर चोथे यांच्या सह अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत महीलांच्या रांगा लागल्या होत्या.शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात कार्तिक स्वामींचे हे एकमेव मंदिर आहे.

























