चोपडा महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘रानभाजी प्रदर्शनाला’ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चोपडा महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘रानभाजी प्रदर्शनाला’ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘रानभाजी प्रदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के.एन. सोनवणे होते. यावेळी उपप्राचार्य व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. एस. पाडवी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना उपप्राचार्य व विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. एम. बागुल उपप्राचार्य म्हणाले की, “रानभाज्यांची ओळख ही फक्त स्थानिक नावानुसार महत्त्वाची नसून जागतिक स्तरावर वनस्पतींचे शास्त्रीय नावांची ओळख ही महत्त्वाची असून अचूक अशी पद्धती वनस्पतीशास्त्रात प्रचलित आहे त्याचे आहारातील महत्त्व पाहता त्याचा वापर आहारात होणे आवश्यक आहे.

यावेळी “रानभाज्या या नैसर्गिक असून त्या विशिष्ट कालावधीत येत असतात त्यामुळे रानभाज्यांचे मानवी जीवन शैलीत अनन्यसाधारण महत्व आहे”, असे महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले.

या रानभाजी प्रदर्शनात सुमारे 25 विविध प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. सोबतच त्यांचे पोषक तत्व, औषधी तत्व इत्यादी माहिती शास्त्रीय वर्गीकरण या संबंधात माहिती पुरवण्यात आली होती. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी 25 प्रकारच्या विविध रानभाज्यांचे हस्तलिखित भित्तीपत्रके सुद्धा तयार करून माहिती देण्यात आली.

या रानभाजी प्रदर्शनाचे उदघाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा या संस्थेच्या सचिव मा . डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधून रानभाज्यांची माहिती जाणून घेतली व सदर रानभाज्यांविषावी जागरूकता निर्माण करण्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या प्रसंगी रानभाज्यांसोबत जळगाव येथील वेंकटेश मशरूम त्यांचा यांचे मार्फत सदर कार्यक्रमाकरिता जळगाव यांचा खाद्य मशरूम आणि त्यांचे विविध पदार्थ या संदर्भात स्टॉल लावण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जे. जी. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पी. एन. सौदागर यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता फुलचंद पाटील, श्रीमती व्ही. व्ही. देसले, आर. व्ही. पाटील, रमण पाटील आणि यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.