कामत शिंगवे येथील योगेश जाधव खुन प्रकरणी जवखेडे दुमाला येथील आरोपी पोपट आदमाने यास दंडासह जन्मठेपेची शिक्षा
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथील योगेश एकनाथ जाधव याच्या खुन प्रकरणी जवखेडे दुमाला येथील पोपट आदमने यास अहिल्या नगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यामुळे आदमने समर्थकात तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबतची घटना अशी की दिनांक 24 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान संशयित आरोपी पोपट आदमने राहणार जवखेडे दुमाला ता.पाथर्डी यांने कामत शिंगवे ता. पाथर्डी येथील जाधव वस्तीवर जाऊन एकनाथ गणपत जाधव यांच्या घरात घुसून त्यांचा 23 वर्षीय तरणाबांड मुलगा योगेश एकनाथ जाधव याच्या डोक्यात बंदुकीतून गोळ्या झाडून जीवे ठार मारले होते.ही प्रत्यक्ष दर्शनी घटना घडत असताना फिर्यादी एकनाथ गणपत जाधव यांचे नातेवाईक दिपा जाधव,नंदा जाधव, वसंत खाटीक हे मयत योगेश जाधव याला वाचवण्यासाठी मध्ये आले असता आरोपी आदमने याने त्यांच्या वर ही तलवारीने हल्ला केला होता.आणि सर्वांना जखमी केले होते.या बाबद पाथर्डी पोलिस स्टेशनचे तत्कालीन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी आरोपी आदमने यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 302,307,323,324,452,120(ब),आणि आर्म ॲक्ट कलम 3/25, 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करून न्यायालयात चार्जशीट दाखल केले होते. सरकारी वकिलांनी न्यायालयात एकूण 17 साक्षिदार तपासले होते.आणि आरोपीने गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध केले होते.पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती.त्यांनी अतिशय नि:पक्षपाती पणाने या गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात साक्ष दिली होती. सरकारी वकिल जी.के.मुसळे यांनी अत्यंत प्रभावशाली युक्तिवाद करून आरोपीच्या विरोधात साक्षी आणि पुरावे गोळा करून न्यायालयात बाजू मांडली होती.न्यायालयाने सर्व युक्तिवादातील बाजूंचा अभ्यास करून आरोपी पोपट आदमने यास तत्कालीन भारतीय दंड विधान संहिता कलम 302 प्रमाणे जन्मठेप आणि 30 हजार रुपयांचा दंड, कलम 307 अन्वये 10 वर्षे सक्त मजुरी आणि 10 हजार रुपयांचा दंड,कलम 452 अन्वये 3 वर्षे सक्त मजुरी आणि 1 हजार रुपयांचा दंड, तसेच आर्म ॲक्ट कलम 3/25 अन्वये 1 वर्षे सक्त मजुरी आणि 1 हजार रुपये दंड या प्रमाणे शिक्षा सुनावली आहे.एकुन चौदा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.या खटल्यात सरकारी वकिल जी.के.मुसळे आणि निखिल मुसळे वकील यांची भुमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.आरोपीला शिक्षा होण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी,पोलिस हेड कॉन्स्टेबल अण्णासाहेब चव्हाण,आणि अरविंद भिंगारदिवे यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि निःपक्षपाती पणाने या खटल्याचा तपास करून न्यायालयात भक्कम साक्षी आणि पुरावे गोळा केले होते. पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर जाधव आणि रासायनिक व्हीसेरा याचा अहवाल सादर करणाऱ्या गौरी वेंगुर्लेकर व एन. व्ही. खरात यांच्या साक्षी न्यायालयात आरोपीला शिक्षा होण्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आल्या. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा उपप्रमुख आणि युवा नेते स्वर्गवासी अनिल संतराम कराळे यांनी मयत जाधव कुटुंबातील सदस्यांना आधार देत विषेश सहकार्य केले होते.आणि मयताच्या अंतिम संस्कारास उपस्थित राहुन पोलिस बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस खात्यालाही सरकारी तपास कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न होता विषेश सहकार्य आणि मदत केली होती.आजचा निकाल ऐकण्यासाठी स्वर्गवासी अनिल कराळे असते तर हा निकाल ऐकून त्यांनी कामत शिंगवे गावात निश्चितच फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळी साजरी केली असती. आरोपी पोपट आदमने यांनी ही भारतीय सैन्यात सैनिक म्हणून 17 वर्षे सेवा करून निवृत्ती घेतली होती.परंतू कौटुंबिक कलहातून आणि तीव्र रागातून हा सारा प्रकार घडून गेला होता.अनेकांनी आदमने यांना जाधव याच्या विरोधात भडक माहिती पुरवून हा सारा प्रकार घडवून आनला होता.”राग हाच माणसाचा खरा शत्रू आहे” हे या खटल्याच्या निमित्ताने सिध्द झाले आहे.माणसाने रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्परच राहीले पाहिजे. आरोपी आदमने यांच्या मुलाने ही भारतीय सैन्यात भरती होउन देशसेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. पण वडिलांच्या शिक्षेच्या निकालाने तो निश्चितच निःशब्द आणि विचलित होईल यात तीळमात्र शंका नाही. आरोपी पोपट आदमने हा निश्चितच निर्दोष सुटेल ही जवखेडेच्या ग्रामस्थांची अपेक्षा मात्र या निकालाने फोल ठरली आहे.