कडूभाउ काळे यांच्या संत नागेबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 60 व्या शाखेचा तिसगावात शुभारंभ संपन्न
(सुनिल नजन चिफब्युरो/अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) नाशिक, पुणे, महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, जालना अ.नगर जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या आणि नेवासा तालुक्यातील भेंडा येथील माजी सरपंच असलेल्या कडूभाउ काळे यांच्या श्री संत नागेबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 60 व्या शाखेचा शुभारंभ पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला या नव्या शाखेतील इमारतीची देवा ब्राह्मणांच्या साक्षीने यज्ञ पेटवून पवित्र मंत्रोच्चारात विधीवत महापुजा या इमारतीचे मालक रामनाथ कासोळे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. नंतर आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. यावेळी तालुक्यातून आलेल्या अनेक मान्यवरांना हा प्रश्न पडला होता की संत नागेबाबा मल्टीस्टेट ची पहिली शाखा तिसगाव येथे कार्यरत असताना दुसरी शाखा कशासाठी? परंतु या शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कदम साहेब यांनी सांगितले की अतिशय कमी कालावधीत या नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेने उंच भरारी घेतली आहे. लोकांच्या भरघोस प्रतिसादामुळे आहे त्या शाखेमधिल सर्व लाॅकर संपले आहेत.आता पुन्हा नव्याने आलेल्या सभासदांना तेथे जागा शिल्लक नसल्याने लाॅकर उपलब्ध होऊ शकत नव्हते.म्हणून या एका शाखेचा कारभार पाहताना शाखेत काम करणाऱ्या अधिकारी वर्गाची कमालीची दमछाक होत होती. संपूर्ण राज्यभर नावाजलेल्या व संस्थेच्या स्वच्छ कारभारामुळे आणि लोकांच्या उत्तम प्रतिसादामुळे याच ठिकाणी दुसऱ्या शाखेचा विस्तार करणे अत्यंत गरजेचे होते म्हणून दुसऱ्या शाखेचा अत्यंत तातडीने शुभारंभ करावा लागला.पहिली शाखा ही श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी या नावाने ओळखली जाते.तर आता नवीन शाखा ही श्री संत नागेबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था तिसगाव या नावाने ओळखली जाणार आहे.दोन्हीही शाखेचा कारभार हा वेगवेगळ्या स्वरूपात दोन ठिकाणी कार्यरत आहे.नागेबाबा पतसंस्थेचा एकूण कारभार हा 80 कोटीच्या घरात गेला आहे. दोन्ही शाखा एकाच संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहेत अशी माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल कदम साहेब यांनी दिली. यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती आणि जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे हे म्हणाले की आदरणीय संस्थापक कडूभाउ काळे यांनी पतसंस्थेच्या रुपाने सहकार क्षेत्रात जे जे शक्य होईल ते सर्व गरीब माणसाच्या उद्धारासाठी जे काम केले ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. प्रारंभी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीचे अधिकारी आदिनाथ गर्जे साहेब यांनी प्रास्ताविकात नागेबाबा पत संस्थेचा सर्व लेखाजोखा मांडला. या कार्यक्रमासाठी डॉ.काशिनाथ ससाणे, माधवराव लोखंडे, शरदराव साखरे सर, विक्रमराव ससाणे, सुभाष माने,शेषराव कचरे,दत्तू मराठे, भाऊसाहेब लोखंडे, घनःश्याम शिंदे,अरूण रायकर, डॉ. बाळकृष्ण मरकड,शाम गरड, शंकरराव कातखडे, आस्लम शेख, मनोज सुंदेचा, डॉ.पांडुरंग गाडे, राजाभाऊ मुखेकर,भारत गारुडकर,यशवंत मिसाळ, कन्हैया काळे, दिलदार शेख, मोहनराव वाघडकर,बळीराम सुसे,आबासाहेब काळे, अजित रसाळ,सुभाष चौधरी,राजू चिंधे, भाऊसाहेब फुलारी, बी.डी. गायकवाड, विलास भुजबळ, नारायण वांढेकर, लक्ष्मण गवळी,मोहसिन शेख,सोनू पठाण यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.बचत गट आणि व्यवसायीक महिलांनी या नवीन शाखेत आवर्जून नवीन खाते उघडावे असे आवाहन संत नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.