पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निरीक्षक पदी प्रा. श्री.भागवत महालपुरे तसेच सहनिरीक्षक पदी मा.संजय एरंडे यांची नियुक्ती

पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निरीक्षक पदी प्रा. श्री.भागवत महालपुरे तसेच सहनिरीक्षक पदी मा.संजय एरंडे यांची नियुक्ती

पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निरीक्षक पदी मा. प्रा. भागवत महालपुरे सर तसेच सहानिरीक्षक पदी मा.श्री. संजय एरंडे यांची निवड करण्यात आली असून आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसाठी या दोघांची जबाबदार निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे आदेशाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा. आ. दिलीपभाऊ वाघ यांचे शिफारशीवरून या दोघांची निवड करण्यात आली. या प्रसंगी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
*या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मार्गदर्शक नानासाहेब संजय वाघ तसेच विधानसभा क्षेत्राध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा उपाध्यक्ष पी. डी.भोसले, ता. अध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील सर, नगरसेवक वासुदेव अण्णा महाजन, नगरसेवक भूषण वाघ, श्री. दत्ता पाटील, विनय बाबा जकातदार, प्रशासक रणजीत पाटील, शहराध्यक्ष अझहर खान, भडगाव शहराध्यक्ष श्याम दादा भोसले, शशिकांत चंदिले, शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, युवक शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, हारुण दादा देशमुख, ए. बी. अहिरे सर, अपूर्व थेपडे, संजय सूर्यवंशी, विनोद दांडगे सर, गोपी पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.