Home महाराष्ट्र खबरदार अहिल्यानगर जिल्हात डीजे वाजवाल तर गुन्हे दाखल होणार आणि साउंड सिस्टीमही...

खबरदार अहिल्यानगर जिल्हात डीजे वाजवाल तर गुन्हे दाखल होणार आणि साउंड सिस्टीमही जप्त करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांचे लेखी आदेश जारी

खबरदार अहिल्यानगर जिल्हात डीजे वाजवाल तर गुन्हे दाखल होणार आणि साउंड सिस्टीमही जप्त करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांचे लेखी आदेश जारी

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

खबरदार अहिल्या नगर जिल्ह्यात जर डीजे वाजवाल तर गुन्हे दाखल होणार आणि साउंड सिस्टीम जप्त होणार असल्याचे आदेश अहिल्यानगर चे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शना खाली अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी हे महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत.शनिवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी एका नोटीसी द्वारे हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या नोटीसीतील आदेशां मधील काही महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत डीजे बंदीच्या आदेशाचा कालावधी हा दिनांक १४ सप्टेंबर २०२६ पासून लागू होत असून गणेश स्थापना,गणेश विसर्जन, घटस्थापना ते दसरा या संपूर्ण सण-उत्सवाच्या काळात हा निर्णय कायम लागू राहणार आहे.

कडक निर्बंध हे केवळ डीजे वाजवण्या वरच नव्हे,तर संपूर्ण डीजे साऊंड सिस्टम भाड्याने देणे,पुरवणे किंवा ती उपलब्ध करून देण्यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. डीजे सोबतच लेझर आणि प्लाझ्मा लाईट्सच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

बंदीचे कारण म्हणजे उच्च क्षमतेच्या ध्वनी वर्धकांमुळे (Dolby System) समाजात मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण होते.याचा लहान मुले,वृद्ध व्यक्ती,रुग्ण आणि गरोदर महिला यांच्या आरोग्यावर गंभीर व विपरीत परिणाम होत असल्यामुळे प्रशासनाने हे धडाडीचे पाऊल उचलले आहे. या

कारवाईचा इशारा म्हणजे जे डीजे चालक मालक या सरकारी आदेशाचे उल्लंघन करतील त्या मंडळांवर किंवा साऊंड सिस्टमच्या मालकांवर भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (तसेच भारतीय दंड संहिता कलम २२३ व पर्यावरण संरक्षण कायदा) अन्वये कडक कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील.तसेच वापरलेली बेकायदेशीर साऊंड सिस्टम जप्त केली जाईल.

प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना आणि नागरिकांना या नियमांचे काटेकोर पणे पालन करून हे दोन सण शांततेत व पारंपरिक पद्धतीने (उदा. ढोल-ताशा) साजरा करण्याचे आवाहन केले आहे.तसेच प्रत्येक तालुक्यातील शहरातील गणेश मंडळांना या उत्सव काळात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशा सुचनाही देण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील डीजे चालक मालक यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पाथर्डीच्या शांतता समितीच्या बैठकीत भाजपचे कार्यकर्ते वायकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी डीजे चालक मालक यांच्या वतीने या काळात डीजे वाजवून देण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे शिष्टाई केली होती पण पोलीस प्रशासनाने ती धुडकावून लावली आहे.अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब यांनी सांगितले की आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंमलब जावणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोठे ही गणेश उत्सव काळात डीजे चालक मालक आणि गणेश मंडळ यांनी डीजे वाजवला तर गुन्हे दाखल होणारच आहेत आणि डीजे साउंड सिस्टीमही जप्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले आहे. जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळ आणि सुजाण नागरिक यांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा उत्सव साजरा करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Don`t copy text!