जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट
जळगाव : सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाईत जागरूक नागरिक हीच सर्वात मोठी ताकद असल्याचा संदेश ब्राह्मण सभागृह येथे आयोजित सायबर सिक्युरिटी अवेअरनेस इम्पॅक्ट कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमात सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी उपस्थित नागरिकांना सायबर सिक्युरिटी, ऑनलाइन फ्रॉड आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणाऱ्या विविध फसवणुकीच्या पद्धती समजावून सांगत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील आणि OTP सुरक्षित ठेवण्याचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमासाठी कार्यालय सचिव गणेश भगवान माळी यांनी सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम डॉ. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
यावेळी नागरिकांना Quick Heal Foundation च्या Anti Fraud App विषयी माहिती देण्यात आली. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून घेण्यात आले.
सायबर सुरक्षिततेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी असे जनजागृती उपक्रम पुढेही सुरू राहतील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
















