Home महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलला पहिला जाहीर पाठिंबा;...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलला पहिला जाहीर पाठिंबा; समाधान गरुड यांची प्रभाकर काळे यांच्या विजयासाठी साद

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलला पहिला जाहीर पाठिंबा; समाधान गरुड यांची प्रभाकर काळे यांच्या विजयासाठी साद

 

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले

सोयगाव दि.27, दि. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलला पहिला जाहीर पाठिंबा मिळाला आहे. सोयगाव सोसायटी मतदारसंघातील उमेदवार समाधान बाबूलाल गरुड यांनी महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार प्रभाकर दयालराव काळे यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित करत त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

 

सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे आयोजित महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या प्रचार बैठकीत समाधान गरुड यांनी आपल्या भूमिकेची घोषणा केली.

 

जिल्हा बँकेच्या बळकटीकरणासाठी व शेतकरी हिताच्या दृष्टीने प्रभाकर काळे यांना विजयी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तसेच उपस्थित मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून प्रभाकर काळे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

समाधान गरुड यांनी जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे ,आमदार अब्दुल सत्तार , आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.बैठकीस महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा बँकेचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!