Home जळगाव १३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात २० जूनपासून मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम...

१३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात २० जूनपासून मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक संपन्न

१३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात २० जूनपासून मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक संपन्न

जळगाव प्रतिनिधी – मकरंद कुळकर्णी (दि. २२ जून २०२६): १३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम दि. २० जून २०२६ पासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज, दि. २२ जून रोजी दुपारी ५:०० वाजता मा.श्री विनय गोसावी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (जळगाव भाग) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला श्री नवीनचंद्र भावसार, सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा निवडणूक नायब तहसिलदार,श्री.नितीन माळी, संगणक चालक निवडणूक, श्री.राहुल वाघ, श्री. पितांबर भावसार (भारतीय जनता पार्टी), श्री वाय.एस.महाजन [राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)], श्री. जमील शेख (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) आणि श्री.गजानन देशमुख (शिवसेना) या प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उपस्थित प्रतिनिधींना मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) कार्यक्रमाचे अधिकृत वेळापत्रक सविस्तर समजावून सांगितले. तसेच मतदार यादीतील त्रुटी (अनोमली) दूर करणे, मॅप व अन मॅप मतदार याबाबत प्रशासनातर्फे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. SIR प्रणालीचे फायदे व तोटे यावरही बैठकीत सखोल चर्चा झाली. मतदार यादी अत्यंत अचूक आणि पारदर्शक व्हावी यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या मतदान केंद्रांवर तात्काळ ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) नियुक्त करावेत, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाच्या या मोहिमेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

Don`t copy text!