Home महाराष्ट्र ‌फाल्गुन दुर्गाष्टमी निमित्त पाथर्डीतील शंकर बाबा मठात शंकर गीता पारायण सोहळा संपन्न...

‌फाल्गुन दुर्गाष्टमी निमित्त पाथर्डीतील शंकर बाबा मठात शंकर गीता पारायण सोहळा संपन्न (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम ‌रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)  पाथर्डी शहरातील शंकर बाबा मठात आज दुर्गाष्टमी निमित्त शंकर गीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शंकरबाबा मठात आज सकाळ पासूनच अनेक कार्यक्रमाची रेलचेल होती.सकाळी ६ ते ७ या वेळेत बाबांच्या पादुकांचा महाअभिषेक, दुपारी बारा ते एक महाआरती, दुपारी एक ते तीन महाप्रसाद आणि ३ते६ या वेळेत शंकरगीता पारायण करण्यात आले. राज्य भरातून आलेल्या भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेतला.शहरातील आणि गावाकडील सर्व भाविक भक्त या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आज अष्टमीच्या निमित्ताने  भल्या पहाटे शंकर महाराज मठात नित्यपाठ , पादूका पूजन,श्रींची महापुजा व महाअभिषेक करण्यात आला.या पुजेचे पौरोहित्य अनंतदेवा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले होते.तसेच महाआरती नंतर केडगाव येथील शंकर महाराज मठाचे मठाधिपती विजू महाराज केदारे यांच्या शिष्यगणा सह दुपारी 3 ते ६ या वेळेत शंकर गीतेचे पारायण करण्यात आले. या सोहळ्या साठी मुंबई,पनवेल , केडगाव , अहिल्यानगर नगर,छत्रपती संभाजीनगर , पुणे,येथिल भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. संपूर्ण दिवसभर शंकर महाराजाच्या नामाचा गजर करीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.केडगाव येथील भाविक भक्त महेश भंडारी परिवाराच्या वतीने महा प्रसादाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते.    यावेळी परम पूज्य माधवबाबा महाराज यांनी भाविक भक्तांना उपदेश करताना असे सांगितले की श्रींच्या सान्निध्यात असताना आपल्या हातून अनेक चुका होतात.परंतू या चुका पासून आपण आपले मन शुद्ध करून बाबांच्या संपर्कात राहीले पाहिजे. बाबांच्या संपर्कात असताना आपले मन शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे. त्यांच्यावरच प्रभू कृपा करतात. त्यांचे जीवन व संसार सोन्या सारखा चकचकीत करून टाकतात. त्यासाठी आपले मन स्वच्छ असले पाहिजे.मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असा संदेश त्यांनी आपल्या भक्तांना दिला.एकंदरीत हा दुर्गाष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

‌फाल्गुन दुर्गाष्टमी निमित्त पाथर्डीतील शंकर बाबा मठात शंकर गीता पारायण सोहळा संपन्न

 

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम ‌रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

पाथर्डी शहरातील शंकर बाबा मठात आज दुर्गाष्टमी निमित्त शंकर गीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शंकरबाबा मठात आज सकाळ पासूनच अनेक कार्यक्रमाची रेलचेल होती.सकाळी ६ ते ७ या वेळेत बाबांच्या पादुकांचा महाअभिषेक, दुपारी बारा ते एक महाआरती, दुपारी एक ते तीन महाप्रसाद आणि ३ते६ या वेळेत शंकरगीता पारायण करण्यात आले. राज्य भरातून आलेल्या भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेतला.शहरातील आणि गावाकडील सर्व भाविक भक्त या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आज अष्टमीच्या निमित्ताने

भल्या पहाटे शंकर महाराज मठात नित्यपाठ , पादूका पूजन,श्रींची महापुजा व महाअभिषेक करण्यात आला.या पुजेचे पौरोहित्य अनंतदेवा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले होते.तसेच महाआरती नंतर केडगाव येथील शंकर महाराज मठाचे मठाधिपती विजू महाराज केदारे यांच्या शिष्यगणा सह दुपारी 3 ते ६ या वेळेत शंकर गीतेचे पारायण करण्यात आले. या सोहळ्या साठी मुंबई,पनवेल , केडगाव , अहिल्यानगर नगर,छत्रपती संभाजीनगर , पुणे,येथिल भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. संपूर्ण दिवसभर शंकर महाराजाच्या नामाचा गजर करीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.केडगाव येथील भाविक भक्त महेश भंडारी परिवाराच्या वतीने महा प्रसादाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी परम पूज्य माधवबाबा महाराज यांनी भाविक भक्तांना उपदेश करताना असे सांगितले की श्रींच्या सान्निध्यात असताना आपल्या हातून अनेक चुका होतात.परंतू या चुका पासून आपण आपले मन शुद्ध करून बाबांच्या संपर्कात राहीले पाहिजे. बाबांच्या संपर्कात असताना आपले मन शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे. त्यांच्यावरच प्रभू कृपा करतात. त्यांचे जीवन व संसार सोन्या सारखा चकचकीत करून टाकतात. त्यासाठी आपले मन स्वच्छ असले पाहिजे.मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असा संदेश त्यांनी आपल्या भक्तांना दिला.एकंदरीत हा दुर्गाष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Don`t copy text!