Home पाचोरा “भोर तालुक्यातील चार वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपीस फाशीची मागणी

“भोर तालुक्यातील चार वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपीस फाशीची मागणी

“भोर तालुक्यातील चार वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपीस फाशीची मागणी

प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व विद्यार्थिनीं कडून पोलीस निरीक्षकांना निवेदन”

 

भोर तालुक्यातील नसरापूर (जि. पुणे) येथे घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथे तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ६५ वर्षीय भीमराव कांबळे या आरोपीने एका चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपीस कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी तीव्र मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर एम.एम. महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापिका, लिनेस क्लब पाचोरा अध्यक्षा तथा रेकी आचार्य प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पाचोरा तालुका अध्यक्षा तसेच लिनेस क्लब पाचोरा पी.आर.ओ. कु. चेतना रणदीप हिरे यांच्या प्रयत्नातून पाचोरा पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करण्यात आले.

सदर निवेदन पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार यांना देण्यात आले असून, पीडित चिमुकलीला तातडीने न्याय मिळावा आणि आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.

यावेळी एम.एम. महाविद्यालयाची विद्यार्थीनी पृथ्वी आखाडे, गायत्री क्षीरसागर उपस्थित होती. तसेच या निवेदनासोबत नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्रकही जोडण्यात आले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ परिसरात संतापाची लाट उसळली असून, लवकरात लवकर त्या चिमुकलीला न्याय मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे. अशा अमानुष घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी अत्यंत गरजेची असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Don`t copy text!