“उच्च शिक्षणासाठी हवी महत्त्वाकांक्षा आणि जिद्द” प्रा.शरद पाटील गो.से.हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

“उच्च शिक्षणासाठी हवी महत्त्वाकांक्षा आणि जिद्द” प्रा.शरद पाटील गो.से.हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

 

 

 

पाचोरा- उच्च शिक्षणासाठी महत्त्वाकांक्षा आणि जिद्द हवी कारण यशाच्या वाटा सहज उलगडतात असे मत पुणे येथील प्रा.शरद पाटील यांनी गो.से.हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात ‘अकरावीच्या उंबरठ्यावर’ या त्यांच्या व्याख्यानातून व्यक्त केले.

पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना भविष्यातील यशासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे सांगताना अनेक उदाहरणे दिली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक एन.आर.ठाकरे यांनी विद्यार्थ्यांनी येणाऱ्या एसएससी परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेच्या यशात आपला सर्वोत्तम वाटा उचलावा अशा अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक सागर थोरात, रुपेश पाटील यांनी ईशास्तवानाने केली.

शाळेचे ज्येष्ठ शिक्षक बी .एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा विषयक मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक प्रकाश एकनाथ पाटील,अर्जुनदास पंजाबी,प्रा.भागवत महालपुरे,उपमुख्याध्यापक आर.एल.पाटील,

पर्यवेक्षिका ए.आर.

गोहिल,पर्यवेक्षक आर.बी.बांठिया,किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर,

सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौडिण्य,

सांस्कृतिक विभाग उपप्रमुख आर.बी.बोरसे,कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, बी .एस.पाटील, पी.एम.पाटील, संगीता वाघ यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

कृष्णा पाटील,यशश्री महाजन,धवल सूर्यवंशी, दिव्यराज सोनवणे,

अनुष्का सोनार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.आभार उज्वल पाटील यांनी मांडले तर सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.